पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे ५ जानेवारी रोजी आकाश दर्शन

पिंपरी : नुकत्याच चर्चेत येऊन गेलेल्या ब्लॅक मून तसेच सद्य आकाशात दिसणाऱ्या ग्रहांच्या स्थितीबद्दल पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे खास आकाश दर्शन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०६:३० ते ०८:०० या दरम्यान हा कार्यक्रम होईल.
खगोलप्रेमींसाठी ग्रहगोलांच्या दुनियेबाबत रंजक शास्त्रीय माहिती पुरविण्यासोबतच दुर्बिणीतून चंद्र, गुरू, शनी यांचे दर्शन देखील घडविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पूर्णतः हवामानावर अवलंबून असून आकाश ढगाळ असल्यास कार्यक्रम रद्द होऊ शकतो याची कृपया रसिकांनी नोंद घ्यावी. या कार्यक्रमाला नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी
सायन्स पार्कच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपर्क : ७७४४९४४३३३, वेबसाईट : pcsciencepark.org