फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू तर निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांची नियुक्ती!

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू तर निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांची नियुक्ती!

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) चे संचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सांगली जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सरिता नरके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू यांच्या संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५८ हा असून निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५७ हा आहे. तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक यांचा अधिकृत ई-मेल आयडी observer.pcmc@pcmcindia.gov.in असा आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"