दिल्लीत आज पावसाची शक्यता

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीकरांची आजची (मंगळवार) सकाळ ढगाळ हवामानाने सुरू झाली. आता आज दिवसभरात हलका आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मते, दिल्लीतील काही ठिकाणी हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये रोहिणी, बादली, पितमपुरा, मुंडका, पश्चिम विहार, पंजाबी बाग, राजौरी गार्डन, बुद्ध जयंती पार्क, जाफरपूर, नजफगड, द्वारका, दिल्ली कॅन्ट, पालम, वसंत विहार, वसंत कुंज आणि एनसीआरचा काही भाग समाविष्ट आहे.
आज सकाळी ८.३० वाजता किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअसवर स्थिरावले, जे सामान्यपेक्षा २.२ अंश जास्त होते, तर आर्द्रता पातळी ९१ टक्के होती.