फक्त मुद्द्याचं!

21st February 2026
पिंपरी-चिंचवड

दररोज पाणीपुरवठ्यासाठी पक्ष बाजूला ठेवून सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज : राहुल कलाटे

दररोज पाणीपुरवठ्यासाठी पक्ष बाजूला ठेवून सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज : राहुल कलाटे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा  शुक्रवारी पार पडली. पहिल्याच सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन नवनिर्वाचित सदस्यांनी कामकाजातील सहभाग दाखवून दिला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते

vcc 5
vcc 5

पिंपरी चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा हक्क आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा प्रश्न संपूर्ण शहराचा असल्याने सत्तेत आणि विरोधात असलेल्या प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून, शहराला दररोज आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचे एकच लक्ष्य ठेवले पाहिजे.” अशी ठाम भूमिका नगरसेवक राहुल कलाटे यांनी मांडली.

महानगरपालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या पाणी तसेच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. यावेळी प्रभाग क्रमांक २५ (वाकड-ताथवडे-पुनावळे) च्या वतीने प्रतिनिधित्व करताना, कलाटे यांनी भूमिका स्पष्ट केली. राहुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सभागृहात अत्यंत खंबीर आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. उपस्थित सर्वच नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाण्याचा प्रश्न मांडला. मात्र, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी एका व्यापक दृष्टिकोनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.

शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून गेल्या वर्षभरात वीस हजार पेक्षा जादा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. याबाबत महापालिकेने काय कारवाई केली असा प्रश्न माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी उपस्थित केला.मागील चार वर्षात नगर सदस्य नसल्याने अधिकारी वर्ग कार्यकर्त्यांना याबाबत कोणतीही दाद देत नव्हते .आता महापालिका अधिकाऱ्यांनी याबाबत काय नियोजन केले याची माहिती सभागृहाला मिळावी अशी त्यांनी मागणी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"