विधान परिषदेसाठी नाना काटेंचा दावा!

चिंचवड :-विधान परिषदेतील पाच आमदारांच्या जागांवर येत्या २७ मार्चला निवडणूक होणार आहे. यात अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा मिळणार आहे. या एका जागेवर अजितदादा पवार यांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटे यांनी दावा केला आहे.
चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढं संधी दिली जाईल, असा शब्द अजितदादांनी दिला होता. हा शब्द अजितदादा या विधानपरिषद निवडणुकीत पाळतील आणि मला उमेदवारी देतील, असे म्हणत नाना काटेंनी या जागेवर दावा केला आहे. तसेच मी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्याशी संवाद साधला होता. आणि तुम्ही भाजपच्या शंकर जगताप यांच्यासाठी माघार घ्या, आम्ही भविष्यात तुमच्यासाठी कुठं तरी कामी येऊ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
याचीच आठवण करुन देत, आता तो क्षण आणि तो दिवस या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आल्याचे नाना काटे यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी आमदार शंकर जगताप ही माझ्यासाठी शब्द टाकतील आणि विधानसभेची परतफेड करतील अशी अपेक्षा नाना काटे यांनी प्रसार माध्यमांना बोलून दाखवली आहे.
विधान परिषदेसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, पुणे शहराचे दीपक मानकर यांच्यासह राज्यभरात अनेक इच्छुक आहेत,