नाना काटे सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : 4893 गणेशमूर्तीचे संकलन!

पिंपळे सौदागर… पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते.

मागील ९ वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर,- रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे, यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण 4893मूर्ती दान करण्यात आल्या.
रहाटणीत ३,९९६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन!
रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंपाजवळ गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ३,९९६ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शुभम नखाते युवा मंच यांच्या वतीने पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठेवत यावेळी निर्माल्य, प्लास्टिक आणि पूजेचे इतर साहित्य स्वतंत्रपणे संकलित केले.
चंद्रकांत नखाते म्हणाले, गणरायाच्या विसर्जनाचा हा सोहळा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर श्रद्धा, संस्कार आणि पर्यावरणपूरकतेचा संगम होता. भक्तांनी विधीवत पूजा, आरती आणि मंत्रोच्चारांद्वारे बाप्पाला निरोप देताना निर्माल्य व प्लास्टिक वेगळे संकलित करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला.’