महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरची दिव्या देशमुख अजिंक्य!

जॅार्जिया जॅार्जिया देशातील बुटमी या शहरात झालेल्या महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्रातील नागपूरच्या दिव्या देशमुख ने ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी वर विजय मिळवून अजिंक्यपद मिळवले. अजिंक्य पद मिळविणारी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे .दिव्या देशमुख ही शांत आणि संयमी खेळाडू असून तिच्या चाली आक्रमक असतात. तिने खेळलेली चाल दिग्गज खेळाडूंना देखील मात देण्यासाठी पुरेशी ठरते.

दिव्या देशमुख ने आजपर्यंत जगभरातील विविध स्पर्धांमध्ये 25 सुवर्ण ,सहा रौप्य आणि चार कांस्यपदे जिंकली आहेत . बुद्धिबळ अॅलिपियाड मध्ये तिच्या नावावर सुवर्ण आणि कास्यपदक आहे .ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आणि तीन वेळा आशियाई विजेती असलेल्या दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरनॉर्म सह बुद्धिबळातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा महिला ग्रँडमास्टर किताब सुद्धा पटकावला आहे . बुद्धिबळातील या अद्वितीय कामगिरी आणि योगदानाबद्दल राज्य सरकारने दिव्याला दोन वर्षांपूर्वी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे .
महिला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजतेपद मिळविणाऱ्या दिव्या देशमुखला सुमारे 42 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे .उपविजेती कोनेरू हम्पी हिला तीस लाख रुपये मिळाले आहेत . दिव्याचे वडील डॉक्टर जितेंद्र देशमुख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून आई डॉक्टर नम्रता देशमुख या खाजगी क्लिनिक चालवत होत्या .दिव्याच्या आई वडिलांचा खेळाशी कोणताही संबंध नाही ,तरीदेखील दिव्याने हे अलोकिक यश मिळविल्याने तिची प्रशंसा केली जात आहे.

