पूर्वी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा खून ;आरोपी अटक!

पिंपरी: पूर्वी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास येलवाडी, ता. खेड येथे घडली.

याबाबत महेश विलास धाकतोंडे (वय 29, रा. लक्ष्मण साखरे यांचे खोलीत भाड्याने, हिराई रोड ओंकार पॅलेस, हिंजवडी) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अमोल पोपट वाघ (वय 30, आराध्य मेडिकल समोर येलवाडी, ता. खेड मुळगाव- आंबेडकर चौक मनमाड, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे भाऊ योगेश धाकतोंडे त्याचा मित्र ऋषिकेश पवार व श्याम डोंगरे असे तिघेजण ऋषिकेश पवार यांच्यासोबत झालेल्या पूर्वीच्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेले होते. ही भांडणे सोडवताना आरोपी यांनी फिर्यादीचे भाऊ योगेश विलास दहातोंडे (वय 32 ,रा. प्रतीक सावंत यांचे घरी भाड्याने, वराळे गाव, ता. खेड मुळगाव- मेडवण, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) यांच्या उजव्या बरगड्या जवळ चाकू खुपसून त्यास जीवे ठार मारले, व ऋषिकेश पवार (वय 27) यांच्यावर चाकूने वार करून त्यास जखमी केले. महाळुंगे पोलिसांनी आरोपी अमोल पोपट वाघ यास अटक केली आहे. महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाळ हे पुढील तपास करत आहेत.

