फक्त मुद्द्याचं!

25th April 2026
गुन्हेगारी

घरगुती भांडणात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून!

घरगुती भांडणात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून!

पिंपरी : घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात फिर्यादीच्या मामाला आरोपीने लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. ही घटना गुरुवार 23 एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मौजे परंदवडी ता. मावळ गावचे हद्दीत मनोहर भोवते यांच्या वीट भट्टीवर घडली. लक्ष्मण उर्फ दगडू मुकणे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सुनिता लक्ष्मण उर्फ दगडू मुकणे (वय 27, रा. मनोहर अण्णाजी भोवते यांच्या वीटभट्टीवर, रीना रोज नर्सरी जवळ, परंदवडी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष रघु वाघमारे (वय 40, मनोहर अण्णाजी भोते यांच्या वीटभट्टीवर, परंदवडी, ता. माव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परंदवडी येथील मनोहर अनाजी भोते यांचे वीटभट्टी वरील खोल्यांच्या समोरील मोकळ्या जागेत फिर्यादीचे पती व आरोपी यांच्यात घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्याकरिता फिर्यादीचे मामा मयत लक्ष्मण उर्फ दगडू मुकणे गेले होते. फिर्यादीचे पती कोणाचे काही ऐकत नव्हता म्हणून आरोपीने मयत लक्ष्मण मुकणे यांच्या डाव्या कानावर लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सपकाळ हे पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

तडीपार गुन्हेगाराकडे पिस्टल मिळाल्याने अटक!
पिंपरी : देशी बनावटीचे पिस्टल विनापरवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्या तडीपार गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार 24 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता च्या सुमारास मुकाई वस्ती, बावधन, ता. मुळशी या ठिकाणी करण्यात आली.

याप्रकरणी बाबासाहेब कुंडलिक पोटे पोलीस शिपाई, बावधन पोलीस ठाणे, यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राहुल सुरेश गोणते (वय 24, आतश्री समर्थ पूर्वा सोसायटी, फ्लॅट नंबर 401, दौलत पेट्रोल पंपाच्या मागे भुगाव, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल गोणते यास पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण हद्दीतून बारा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. तडीपारीची मुदत संपण्याअगोदरच तो बिगर परवानगी पुन्हा दाखल झाला. पिंपरी चिंचवड उप आयुक्त परिमंडळ दोन, न्यायालयाची परवानगी न घेता मिळून आला. याशिवाय घातक शस्त्र जवळ बाळगण्यास प्रतिबंध असताना आदेशाचा भंग करून एक पिस्टल जवळ बाळगले याबाबत बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारणे तपास करत आहेत. तडीपार गुन्हेगाराकडे पिस्टल मिळाल्याने अटक

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"