फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

वाकड–ताथवडे, काळाखडक परिसरात पालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम!

वाकड–ताथवडे, काळाखडक परिसरात पालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम!

४३ झोपड्या हटवत ३८ हजार ७५० चौ. फूट क्षेत्र केले अतिक्रमणमुक्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या १८ मीटर रस्त्यावरील ४३ झोपड्यांचे सुमारे ३८ हजार ७५० चौरस फुटांवरील बांधकाम निष्कासित केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्यालय अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या या कारवाईत कार्यकारी अभियंता सुनिल शिंदे,राजेंद्र शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने काळाखडक, वाकड येथील स. नं. १२४/१ या मिळकतीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून असलेल्या मंजूर विकास योजनेतील भूमकर चौक, वाकड येथील ताथवडे हद्दपर्यंत १८ मी. रस्त्याने बाधित होणाऱ्या २०० मीटर लांब व १८ मीटर रुंद असलेल्या सुमारे ३८ हजार ७५० चौरस फूट क्षेत्रामध्ये ४३ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग, प्रशासन व स्थापत्य, शहरी दळणवळण विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशामक व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सदर रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपड्या/वीट बांधकाम ड क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाच्या ४ पोकलेन्ड, ४ जेसीबी, ६ डंपर व २० मजुरांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास योजना आणि सार्वजनिक सुविधांच्या अंमलबजावणीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. वाकड-ताथवडे परिसरात १८ मीटर रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"