महापालिका औद्योगिक प्रशिक्षण विभाग आणि बीव्हीजी यांच्यात सामंजस्य करार!

शैक्षणिक व रोजगारासाठी करार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण विभाग आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांच्यावतीने शैक्षणिक व रोजगारासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, औद्योगीक प्रशिक्षण विभागाचे प्राचार्य शशिकांत पाटिल, बीव्हीजी इंडीया लिमिटेड अप्रेंटिसशिप विभागाचे प्रमुख रवी घाटे, अप्रेन्टिस व्यवसाय विकास प्रमुख प्रमोद पवार हे यावेळी उपस्थित होते.
ख्यातनाम उद्योजक हणमंतराव गायकवाड यांच्या बीव्हीजी उद्योगसमूहामध्ये सध्या ९२,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असून ग्रुप विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर तसेच परिसरातील शहरांमधील आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. हा विचार करून आस्थापनांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे व त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक तांत्रिक धोरण ठरविण्यात आले असून त्यानुसार सदर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
महापालिकेचा औद्योगीक प्रशिक्षण विभागच्या माध्यमातुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, विशेषता हॉस्पिटल हाऊसकीपिंग ट्रेडच्या विद्यार्थ्यांना, एक्सपर्ट फॅकल्टी प्रोग्राम तसेच ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्रामही बीव्हीजी इंडीया लिमिटेडच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे. तसेच बीव्हीजीच्या माध्यमातून एनएसडीसी प्रमाणित अद्यावत स्किल कोर्सेस तसेच उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे.