शहरातील 50% पेक्षा जादा सीसीटीव्ही कॅमेरे सुरुच झाले नाहीत !

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरातील एकूण ८ हजार ७९० सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण प्रणालीशी जोडण्यात आले असून त्यापैकी सध्या ३ हजार ८२७ कॅमेरे कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) येथे महापौर रवि लांडगे यांनी भेट देऊन शहरातील विविध नागरी सेवांचे तांत्रिक पद्धतीने करण्यात येणारे मॉनिटरिंग व नियंत्रण प्रणालीची सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी हे सत्य बाहेर आले. महापौर रवि लांजगे यांनी याबाबत सविस्तर चौकशी करावी.

स्मार्ट सिटी संकल्पनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या कमांड सेंटरच्या माध्यमातून शहरातील विविध नागरी सेवा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन तसेच आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणाऱ्या प्रतिसाद प्रणालीचे एकाच ठिकाणाहून रिअल-टाईम निरीक्षण केले जाते. या प्रणालीमुळे शहरातील विविध घडामोडींवर त्वरित लक्ष ठेवणे तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे अधिक सुलभ झाले आहे.अशी माहिती कार्यकारी अभियंता अभिमान भोसले यांनी महापौर रवि लांडगे यांना दिली.
या भेटीदरम्यान महापौर रवि लांडगे यांनी शहरातील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन प्रणाली तसेच विविध विभागांचे रिअल-टाईम मॉनिटरिंग याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुकर व अधिक कार्यक्षम नागरी सेवा देण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
3 हजार 827 सीसीटीव्ही कॅमेरे बंद
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरातील एकूण ८ हजार ७९० सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण प्रणालीशी जोडण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रमुख चौक, रस्ते तसेच महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर सतत देखरेख ठेवली जात आहे. त्यापैकी सध्या फक्त ३ हजार ८२७ कॅमेरे कार्यरत असून त्यांचे थेट प्रक्षेपण कमांड सेंटरमधून पाहता येते. महापालिकेने करोडो रुपये सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण प्रणालीसाठी खर्च केले आङेत. केही सीसीटीव्ही कॅमेरे आजपर्यंत सुरुच झाले नाहीत. निकृष्ट दर्जाचे बसविण्यात आल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच काही कॅमेरे देखभाल, दुरुस्ती अथवा तांत्रिक कारणांमुळे तात्पुरते बंद असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बंद असलेले नवीन कॅमेर्यांसाठी आता नहापालिका पुन्हा खर्च करणार?महापौर रवि लांजगे यांनी सविस्तर चौकशी करावी.

