फक्त मुद्द्याचं!

19th February 2026
पिंपरी-चिंचवड

सांगवी येथील महाआरोग्य शिबिराचा ३५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ!

सांगवी येथील महाआरोग्य शिबिराचा ३५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. यावेळी १०० हून अधिक नागरिकांचे आयुष्मान कार्डे तयार करून देण्यात आले.

viara vcc
viara vcc

शिबिराचे उद्घाटन महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या हस्ते,माजी महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बडगे, फिजिशियन डॉ. देवयानी लोंढे, बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक पाटील उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी दंत तपासणी, नेत्र तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, बालकांची व किशोरवयीन मुलांची तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, वृद्ध नागरिकांची तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, रक्त तपासणी तसेच औषधांचे वितरण अशा सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याशिवाय नागरिकांना आयुष्मान कार्डे व आभा कार्डे काढून देण्यात आले. भूलरोगतज्ज्ञ डॉ. मोनाली क्षीरसागर यांनी उपस्थितांना सीपीआरचे प्रात्यक्षिक करून आवश्यक ते मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमधील व मोफत शिबिरांमधील सेवा नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. प्रतिबंधात्मक तपासण्या आणि लसीकरण यामुळे नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे. — डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"