भोसरीच्या मातीतला देवमाणूस महेशदादा

- प्रा.दिगंबर ढोकले
गेली 33 वर्षे शारदा क्लासेस च्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आलेलो आहे. जन्मभूमी करंदी असूनही भोसरीच्या मातीशी एकरूप झालो आहे. लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखा या संस्थांच्या माध्यमातून साहित्यिक आणि सामाजिक कार्य करत असताना तसेच विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करत असताना आमदार महेश दादांशी मैत्र निर्माण झाले होते.
त्याचबरोबर दरवर्षी शारदा क्लासेसच्या गुणगौरव सोहळ्यात दादांची उपस्थिती असायचीच. त्यांच्याच हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पाडला जायचा. विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा दादांची उपस्थिती प्रेरणादायी असायची. कोणत्याही कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून दादा वाट काढत आवर्जून भेट घेत. आश्वासक असे हस्तांदोलन करत. त्यातून एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असे.

आदरणीय महेश दादा, सचिन भैय्या आणि कार्तिक भाऊ यांना आमचे सन्मित्र विनय सातपुते यांनी श्रावण बाळ पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये मला निमंत्रित केले होते. त्यावेळी दादांचे आई-वडील उपस्थित होते. दादांच्या मातोश्री प्रथमच व्यासपीठावर विराजमान होत्या. त्यावेळी मी व्यक्त केलेले मनोगत आणि त्याचा बनवलेला छोटासा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज झाले होते. त्यात मी पहिलवान या शब्दाची फोड करताना असे म्हटले होते की – आईच्या दुधाचं पहिलं वाण जो आयुष्यभर जपून ठेवतो तो खरा पहिलवान खरोखर त्या व्हिडिओमुळे मला एक वेगळी ओळख प्राप्त झाली होती. जिथे जाईल तिथे अनोळखी लोक सुद्धा मला ओळखत होते. ही खरंतर महेश दादांची किमया होती.
असो अशा विविध प्रसंगांतून दादांशी ऋणानुबंध निर्माण झाले होते. काळ पुढे सरकत होता. माझी नित्याची कामे चालूच होती. पाच महिन्यांपूर्वी मला थोडा चालताना दम लागल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि अँजिओग्राफी केली त्यात मला 90% चे दोन ब्लॉक आढळून आले. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी एन्जोप्लास्टी करून घेतली त्यावेळी मला दोन स्टेन्ट टाकण्यात आल्या. पुन्हा गाडी रुळावर येत होती आणि मी माझ्या शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून दिले. परंतु नियतीला हे पाहवले नाही. पुन्हा मला पहिल्यासारखाच दम लागू लागला आणि मी पुन्हा त्याच डॉक्टरांकडे गेलो. पुन्हा एन्जिओग्राफी करण्यात आली आणि जिथे स्टेन्ट टाकल्या होत्या त्याच्या अलीकडे पुन्हा ब्लॉक तयार झाला होता. पुन्हा अँजिओप्लास्टी करणे शक्य नव्हते म्हणून बायपास सर्जरीचा पर्याय सुचवण्यात आला. माझ्यासहित पुन्हा सर्वजण टेन्शन मध्ये आले. पाच महिन्यापूर्वी झालेली एन्जोप्लास्टी आणि आता पुन्हा बायपास सर्जरी. पण ओपन हार्ट सर्जरी करण्याशिवाय मला काहीच पर्याय नव्हता म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला. आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बायपास सर्जरी करण्याचा निर्णय ठरला.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचा डिजीटल कार्यअहवाल येथे वाचा.
https://tinyurl.com/Shivnerica-Chava-MaheshDada
16 सप्टेंबर 2024 ला बायपास सर्जरी झाली. डॉ. समित चौटा यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे सर्जरी केली. वेळोवेळी Policy pre- approval आल्यामुळे आम्ही निश्चित होतो. थोड्या फार तक्रारी सोडता प्रकृती स्थिर होती. पण डिस्चार्ज वेळी Cashless policy reject झाली आणि पायाखालची जमीन सरकली कारण बिल आले होते 8 लाख रु. एवढी रक्कम उभी करणं शक्यच नव्हतं आणि त्यामुळे डिस्चार्ज लांबत चालला. मला तर कधी घरी जाईल असे झाले होते. एका संकटातून वाचलो पण दुसरे आर्थिक संकट पुढे उभे राहिले. एका हार्ट पेशंट साठी हे खूपच धक्कादायक होते. पत्नी, मुलगी, नातेवाईक, मित्रमंडळी कामाला लागली. कसेबसे साडेतीन लाख जमा झाले होते पण अजून पूर्ण रक्कम उभी राहिली नव्हती.
आशेचा सूर्य – महेशदादा
मी बिलात concession मिळण्यासाठी महेश दादांचे धाकटे बंधू कार्तिक भैय्या लांडगे यांना फोन केला. त्यांनी खूप हळहळ व्यक्त केली. त्यांनी लगेच एक माणूस दिला. त्या माणसाने पण मला खूप आधार दिला आणि सांगितले की मी हॉस्पिटल ला येत आहे काळजी करू नका. दरम्यान श्री वसंत नाना लोंढे यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. प्रवीण लोंढे यांच्या मार्फत दादांशी प्रत्यक्ष फोनवर बोलणे झाले. दादांना सुद्धा खूप वाईट वाटले. दादा म्हणाले -तुमच्यासारख्या माणसाला असं काही होईल असं वाटलं नाही पण असो आता तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. हॉस्पिटल च्या बिलाचे कसलेही टेन्शन घेऊ नका. दादांचे ते धीर देणारे आश्वासक शब्द मला खरंच खूप आधार देणारे ठरले. दादांमुळे मदतीची चक्रे गतिमान झाली. दादांचा एक भला माणूस हॉस्पिटल मध्ये आला. घरच्यांना दिलासा दिला. बिलाची रक्कम एक लाखापर्यंत कमी केली. आणि आम्हाला विचारलं – किती कमी पडतायत? सुरुवातीला भरलेले डिपॉजिट आणि आम्ही गोळा केलेले असे एकूण साडे तीन लाख जमा झालेले आम्ही त्यांना सांगितले. क्षणाचाही विलंब न करता कमी पडणारे 3,55,000 रुपये दादांनी भरले आणि आम्हाला डिस्चार्ज मिळाला. या कलीयुगात अशी मदत फक्त ईश्वरच करू शकतो. आज फक्त तो ईश्वर महेशदादांच्या रूपाने दिसला.
‘’आपुलिया हिता, जो असे जागता, धन्य माता पिता तयांचीया’’ या अभंगोक्तीप्रमाणे दादा तुम्ही वागलात. राजकारणात मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण प्रत्यक्ष कृती करणं अवघड असतं. दादा तुम्ही फक्त वरवर बोलत नाही तर प्रत्यक्ष कृती करता. दादा शब्दाचा अर्थ तुम्ही आज खरा करून दाखवला. माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभा राहिलात.
दादा तुम्ही केवढे उपकार करून ठेवलेत आमच्यावर!! कसं उतराई होणार? आधी आम्ही तुम्हाला फक्त मत दिलं होतं आज हृदय दिलं. संकटात मदतीचा आधार दादा, बोलताना शब्दांची धार दादा . वेळ पडली तर सर्वांत पुढे दादा , सर्वसामान्यांसाठी दिलदार दादा, राम कृष्ण हरी.