फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणामुक्तीसाठी आमदार लांडगे यांचा पुढाकार!

इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणामुक्तीसाठी आमदार लांडगे यांचा पुढाकार!

प्रस्तावित प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्याची ‘पीएमआरडीए’ महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना सूचना
पिंपरी : इंद्रायणी आणि पवना नद्यांमधून दररोज पिंपरी-चिंचवड शहरासाठी 500 ते 600 एमएलडी पाणी उचलले जाते. सुमारे 30 लाख नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्याकडे नदी प्रदूषणावर उपाययोजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी तातडीची बैठक घेण्याची मागणी केली आहे.

viara vcc
viara vcc

गेल्या काही वर्षांत पीएमआरडीए क्षेत्रात झपाट्याने नागरीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले असून, त्याचा थेट परिणाम इंद्रायणी व पवना नदीच्या प्रदूषणावर झाला आहे. अनेक ठिकाणी विना प्रक्रिया सांडपाणी आणि रसायनमिश्रित औद्योगिक सांडपाणी नदीत सोडले जात आहे. परिणामी, नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून, पाण्यातील ऑक्सिजनची पातळी शून्यावर पोहचली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, पीएमआरडीए प्रशासनाने पवना-इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, यासाठीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीला गती देणे आवश्यक असल्याचे आमदार लांडगे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

निघोजे व रावेत बंधाऱ्यांच्या वरच्या बाजूस प्रकल्प सुरू करावेत
निघोजे आणि रावेत बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी जमीन ताब्यात असून प्रदूषणाची तीव्रता अधिक असल्याने, येथे प्राधान्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी आग्रही भूमिका आमदार लांडगे यांनी मांडली आहे. “सुमारे 30 लाख नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून त्वरित निर्णय घ्यावा,” असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"