फक्त मुद्द्याचं!

24th April 2025
पिंपरी-चिंचवड

‘वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड’ चा संकल्प: आमदार महेश लांडगे

‘वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड’ चा संकल्प: आमदार महेश लांडगे

‘मिसिंग लिंक’मुळे शहरातील वाहतूक सक्षमीकरणाला ‘बुस्टर’!
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकालात काढण्यासाठी आम्ही ‘‘वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड’’ असा संकल्प केला आहे. त्या अनुशंगाने महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, एमआयडीसी, पीएमआरडीए अशा विविध अस्थापनांच्या एकत्रित पुढाकाराने ‘‘रेड स्पॉट’’ निश्चित केले आहेत. या भागातील वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘‘मिसिंग लिंक’’चे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक सक्षमीकरण सोपे होईल, अशी भूमिका भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी मांडली.

महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील ऑटो क्लस्टर ते आयुक्त निवासस्थान दरम्यानच्या इंडोलिंक युरोसिटी औद्योगिक परिसरातील मिसिंग लिंक रस्ता विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.यामुळे काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्त्यावरील वाहने कोणताही वळसा न घेता थेट जाण्याची सोय होणार आहे. पुणे महानगर परिवहनाच्या बसेसच्या मार्गात सुसुत्रता येणार आहे. महानगरपालिकेच्या प्राधान्यक्रमातील या कामामध्ये संबंधित मिसिंग लिंक रस्त्यांचे विस्तारीकरण, दुरुस्ती, जलवाहिनी व प्रकाशयोजना व्यवस्था तसेच वाहतुकीच्या सुरळीततेसाठी आवश्यक सुधारणा यांचा समावेश आहे.

निगडी येथील त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्ग तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला जोडणारा हा रस्ता ७५ मीटर रुंद आहे. या प्रकल्पामुळे निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून पुणे–नाशिक आणि जुन्या मुंबई–पुणे महामार्गाशी होणारे दळणवळण सुधारण्यास मदत होईल. मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होण्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण राहील, असा विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

viara ad
viara ad

निगडी भक्ती-शक्ती ते मुकाई चौक बी आर टी एस रस्ता निर्मिती, बोपखेल येथील पूल निर्मिती पिंपरी डेअरी फार्म – पूल निर्मितीचे काम पूर्ण झाले असून,शहर सुशोभीकरणावर भर देणे, स्वच्छता अभियानावर भर देणे, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. शहराचा शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास हे उद्दिष्ट आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि सुकर वाहतूक सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास आहे.- महेश लांडगे, आमदार, पिंपरी-चिंचवड

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"