Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
मनोरंजन

`ऑस्कर`साठी `लापता लेडीज`

`ऑस्कर`साठी `लापता लेडीज`

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
चेन्नई : पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. काल भारतीय चित्रपट महासंघाने ही घोषणा केली.

ऑस्करसाठी भारताकडून प्रवेशिका पाठविण्यासाठी २९ चित्रपट होते. त्यातून याची निवड करण्यात आली. पितृसत्ताक समाजातील महिलांच्या हक्कांवर उपहासात्मक भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आसामी दिग्दर्शक जाहनु बरूआ यांच्या अध्यक्षतेसाखाली असलेल्या १३ सदस्यीय समितीने लापता लेडीज या सिनेमाची निवड केली आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता.

ग्रामीण भागातील रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल झालेल्या दोन वधू – वर यांच्यातील हृदयस्पर्शी प्रेमाची कथा यात दाखविण्यात आली आहे. किरण राव यांचे किंडलिंग प्रॉडक्शन, आमिर खान प्राॉडक्शन, जिओ स्टुडिओजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. छाया कदम, रवी किशन आणि गीता अग्रवाल शर्मा यांच्या विशेष भूमिका आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"