फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
Live news

`अमूल` ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

`अमूल` ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : दूध उत्पादक कंपनी अमूलने दुधाच्या एक लीटरच्या पाकिटांच्या दरामध्ये रुपायाने कपात केली आहे. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ही माहिती दिली आहे.

अमूल ही देशातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने त्यांच्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशल या १ लिटरच्या पाकिटांच्या दरामध्ये १ रुपयाने कपात केली आहे. त्यामुळे आता अमूलच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी अमूलने जून २०२४ मध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. अमूलने केलेल्या या दरवाढीनंतर, मदर डेअरीनेही दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर अमूल गोल्डच्या ५०० मिली पाकिटाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपये झाली होती. तर एक लिटर अमूल गोल्डची किंमत ६४ रुपयांवरून ६६ रुपये प्रति लिटर झाली होते. तसेच अमूल ताजाच्या अर्ध्या लिटर पॅकसाठी ग्राहकांना २६ रुपयांऐवजी २७ रुपये मोजावे लागत होते. त्याच वेळी, अमूल शक्तीच्या अर्ध्या लिटर पॅकेटची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली होती.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"