फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख 86 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!

चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख 86 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!

 चार व्यक्तींना केली अटक
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीमधील भोसरी एमआयडीसी, संत तुकाराम नगर, निगडी आणि आळंदी या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लाख 86 हजार 300 रुपये किमतीचा पाच किलो 720 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगल्याने चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवार 15 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास मरकळ गावचे जवळील तरंग बार अँड रेस्टॉरंट च्या जवळ कल्पना मोरे यांच्या चाळीचे रूममध्ये ही घटना घडली. समीर कुंडलिक काळे पोलीस शिपाई गुन्हे शाखा युनिट तीन यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .जोगाराम माताराम देवासी (वय 27, रा. कल्पना मोरे यांचे चाळीमध्ये, तरंग बार अँड रेस्टॉरंट जवळ, मरकळ ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी दारातर्फे माहिती मिळाल्याने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपी जोगाराम देवासी यांनी विक्रीसाठी एक लाख 80 हजार रुपये किमतीचा 3 किलो 576 ग्रॅम वजनाचा गांजा बाळगल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार 14 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून 30 मिनिटाच्या सुमारास निगडी ओटा स्कीम काळभोर गोठा बाजूने जाणाऱ्या अंतर्गत रोडच्या बाजूला ,अहिंसक महानुबुद्ध ,विहार सेवा ट्रस्ट गेट समोर ही घटना घडली .अमोल श्रीकांत वेताळ (पो.शिपाई, गुन्हे शाखा युनिट 4 ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गणेश अण्णा पवार (वय 27 ,रा. बिल्डिंग नंबर बी 15 /205, अंकुश चौक निगडी )असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश पवार यांनी विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा 550 ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीर रित्या जवळ बाळगला .आरोपी गणेश पवार याला अटक करण्यात आली आहे.

संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने 31 हजार 300 रुपये किमतीचा 644 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ बेकायदेशीरित्या विक्री करण्याकरता जवळ बाळगला .ही घटना सोमवार 15 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटाच्या सुमारास अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील बंद पडलेल्या होस्टेल जवळ, नेहरूनगर येथे घडली याप्रकरणी संतोष भानुदास रजपूत (पो. हवालदार, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. रोहित संतोष विश्वकर्मा (वय 21, रा. नवीन फुलेनगर ,पत्रा शेड नेहरूनगर) असे आरोपीचे नाव आहे आरोपीने 31 हजार 300 रुपये किमतीचा 644 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने त्याला अटक करण्यात आली आहे .

.भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवार 15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पठारे मटन खानावळच्या समोरील रस्त्याच्या शेवटी मोकळ्या जागेत बोराडे वाडी येथे ही घटना घडली. याबाबत उमेश धोंडू सातकर (पो. शिपाई ,एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन) यांनी फिर्यादी दिली आहे. उत्तरेश्वर श्रीहरी दुगाने (वय 21, रा. फ्लॅट नंबर 404, कालिका रेसिडेन्सी ,प्लॉट नंबर 97 /23 ,सेक्टर नंबर 6 ,मोशी, प्राधिकरण) असे आरोपीचे नाव आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी उत्तरेश्वर दुगाने यांनी 47 हजार पाचशे रुपये किमतीचा 950 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या जवळ बाळगला. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"