फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
देश विदेश

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर

हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर

मंडी येथे भूस्खलनात तिघांचा मृत्यू; दोघे बचावले

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :  हिमाचल प्रदेशात पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. सिमला, मंडी आणि आसपासच्या परिसरात खूप मोठे नुकसान झाले आहे. सिमलामध्ये १४१.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठिकठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे राज्यभरातील शेकडो रस्ते आणि वीजपुरवठा बंद झाला आहे. मंडी जिल्ह्यात भूस्खलनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. आज सकाळी दहा वाजता हिमाचल प्रदेशातील तीन राष्ट्रीय महामार्गांसह ६५३ रस्ते बंद करण्यात आले आहेत.

मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथील ब्रगटा गावात काल रात्री भूस्खलनात एका घरातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांना यातून वाचविण्यात यश आले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका आठ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.

मंडी जिल्ह्यातील धर्मपूर बाजाराजवळून वाहणाऱ्या नदीने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे लोक घराबाहेर पडत आहेत. येथील मोठे बसस्थानक पूर्णपणे पाण्यात गेले आहे. हिमाचल प्रदेशातील एचआरटीसी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. या नदीच्या काठी असलेली घरे सुद्धा वाहून गेली आहेत. सखल भागातील घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे लोक वरच्या मजल्यांवर आसरा घेत आहेत. एका वसतिगृहातील १५० विद्यार्थ्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आसरा घेतला आणि आपला जीव वाचवला आहे. विविध बचाव पथक नागरिकांच्या मदतीसाठी सध्या तैनात आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"