फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

बांधकाम साईडवर पंधराव्या मजल्यावरून पडून मृत्यू; एकास अटक!

बांधकाम साईडवर पंधराव्या मजल्यावरून पडून मृत्यू; एकास अटक!

पिंपरी: बांधकाम ठेकेदाराने साइटवरील कामावर सुरक्षेची काळजी न घेतल्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 7 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास डी विंग, गणेश बेलारोसा, फेस -2, पुनावळे येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अल्लाउद्दीन मोहम्मद दिन अन्सारी (वय 20, बिरेचिता, जि. महाराजगंज, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. सद्दाम अमीन अन्सारी (वय 35, सध्या रा. तापकीर मळा चौक, काळेवाडी, ता. हवेली, मूळ रा. जठ्ठाबाजार , कुशीनगर, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा धाकटा भाऊ हा आरोपी अन्सारी यांच्याकडे बांधकाम साइटवर काम करत होता .गणेश बेलारोसा, फेज दोन ,पुनावळे या साइटवरील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावरील डकमध्ये पडला. यावेळी बांधकाम व्यावसायिकाने साईड बांधकामावर कामगारांना हेल्मेट पुरवठा,व सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली नाही. पंधराव्या मजल्यावरून अझरुद्दीन मोहम्मदिन अन्सारी (वय 18) हा पडून मृत्यू पावला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती रावेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"