फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पिंपरी-चिंचवड

समाजात सर्व धर्म समभाव राखणे हाच खरा दीपोत्सव : डॉ.कैलास कदम

समाजात सर्व धर्म समभाव राखणे हाच खरा दीपोत्सव : डॉ.कैलास कदम

पिंपरी : आकुर्डी येथील हॉटेल कियार्ड बँक्वेट्स येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिवर्षीप्रमाणे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावर्षी सर्व धर्म दीपावली सन्मान सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला .

vishnoi dipavli 3
vishnoi dipavli 3

पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील, विविध धर्मातील कर्तुत्ववान व्यक्तींचा महात्मा ज्योतिबा फुले यांची फुले पगडी, शाल, उपरणे ,सन्मानचिन्ह, इंदिरा गांधी यांचे पुस्तक, मिठाई, पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे वारकरी संप्रदाय, मौलाना अब्दुल गफार अन्सारी धार्मिक विभाग ,पूज्य भंते राहुलजी धार्मिक विभाग ,सुधीरजी पारकर धार्मिक विभाग, सावनी रविंद्र पार्श्वगायिका ,डॉक्टर वसंतराव चाबूक स्वार शैक्षणिक विभाग ,पीव्ही भास्करनजी सामाजिक विभाग ,माधव सहस्रबुद्धे पत्रकारिता ,शाहीर बापू पवार कला विभाग ,ऑफिस अफजल खान पठाण धार्मिक विभाग ,अश्विनी सातव डोके मुक्त पत्रकारिता ,सुरेशजी विटकर योगसाधना ,राजेश तिवारी उद्योजक ,रमेश उमरगे अण्णा न्यायाधीश लोक आदालत कायदा विभाग ,रघुनाथ जी मोरे निवृत्त पोलीस अधिकारी ,शशी धरणजी नायर कृष्ण मंदिर अध्यक्ष या मान्यवरांचा सन्मान शहराध्यक्ष डॉक्टर कैलास कदम ,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे ,माजी महापौर कवीचं भाट यांच्या हस्ते करण्यात आला .

डॉक्टर कैलास कदम यावेळी म्हणाले की ,शहर काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन शहरातील सन्माननीय उपस्थित राहिले त्यांचे आभार व्यक्त केले. या सर्वांचा सन्मान करताना अध्यक्ष म्हणून मला आनंद होत आहे .गेल्या काही वर्षापासून जाणून-बुजून धर्माधर्मात ,जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. म्हणून सर्व धर्म हा विचार घेऊन चालणाऱ्या काँग्रेस पक्षाची सर्व समाज घटकास समान न्याय हक्क देण्याची मोठी जबाबदारी आहे. दिवाळी सण म्हणजे सर्व धर्म समभाव जपणे हाच खरा दीपोत्सव आहे. समतेचा विचार घेऊन सर्वांना एकत्र घेऊन सामाजिक सलोखा जपण्यासाठी आम्ही सर्व एक आहोत हा संदेश देण्यासाठी पक्षाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .काँग्रेस पक्षाच्या विचारातून पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आशिया खंडात श्रीमंत महापालिका असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आज 15000 कोटी पेक्षा जास्त कर्जाचा बोजा करदात्या नागरिकांवर लादण्यात आला आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शहराला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे असे कदम यांनी आवाहन केले आहे .

यावेळी पृथ्वीराज साठे आणि सन्मानार्थि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप यांनी केले .सूत्रसंचालन वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी तर आभार चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी यांनी मांनले .यावेळी शामलाताई सोनवणे ,बाबासाहेब बनसोडे, निर्मलाताई खैरे ,अर्चनाताई राऊत, जन्नताई सय्यद ,डॉक्टर मनीषाताई गरुड ,अमर नानेकर, विठ्ठल शिंदे ,भाऊसाहेब मुगुटमल, बाबूलाल वाघमारे ,सचिन गायकवाड ,रवी नांगरे ,फिरोज तांबोळी ,अमरजीत सिंह, अॅड. अनिकेत रसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"