महेशदादा : कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता

- अमित गोरखे, आमदार, संस्थापक अध्यक्ष – कलारंग सांस्कृतिक संस्था पिंपरी चिंचवड.
पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये बहुमोल असे योगदान देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भोसरी विधानसभेचे आमदार, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष महेश लांडगे होत.
दादा म्हणून ते जनमानसात लोकप्रिय ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान आणि देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या व्यक्तिमत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोक मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकारणात समाजकारणात सदोदित कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महेश दादा. देवेंद्र भाऊंच्या विकासाची कास, विकासाचा स्वप्न घेऊन गेल्या दहा वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका महेशदादांनी बजावली आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री असताना राज्याच्या माध्यमातून अधिकाधिक निधी अधिकाधिक प्रकल्प शहरांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आहे.

प्रखर विचार आणि कार्यकर्त्यांशी नाळ!
महेशदादा विषयी बोलायचे झाल्यास हे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी, प्रखर हिंदुत्ववादी असं आहे. क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, कुस्तीगीर, महापालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार असा दादांचा यशाचा आलेख मी जवळून पाहिला आहे. मैत्री जपणारा आणि दिनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाणार हे व्यक्तिमत्व आहे. सदैव हसमुख आणि गरजवंतांना मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व आहे.
भोसरी परिसरातील वारकरी सांप्रदायिक कुटुंबात जन्मलेल्या महेश दादा लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. लोकसेवेचे मोठं काम उभं केलं आहे. कार्यतर्फर कार्यतत्पर राहणे, मदतीला धावून जाणे आणि कुणाचीही भिड भाड न ठेवता जनतेच्या कामांना प्राधान्य देणे हा त्यांचा गुण सर्वांना भावणारा आहे.
आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे, दादांनी एखादी गोष्ट ठरवली तर ती तडीस नेल्याशिवाय ते स्वस्त बसत नाहीत. याविषयीचे अनेक उदाहरणं आहेत. विकासापासून वंचित असणाऱ्या समाविष्ट गावांचे चेहरा मोहरा बदलण्यात महेश दादांचे मोठे योगदान आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर हजारो कोटींचा निधी गावांना देऊन त्या गावांचे रूपडं बदललं आहे.
दादांच्या कामांचा सपाटा
पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळवून देणं असेल, किंवा वर्षानुवर्ष रखडलेला अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा प्रश्न असेल, भोसरी परिसरातील बफर झोन, इंद्रायणी नदी सुधारला मंजुरी, मोशी येथील संभाजी महाराजांचा पुतळा, संविधान भवन, वेस्ट एनर्जी प्रकल्प संतपीठ, भोसरीतील कुस्ती संकुल, भोसरी विधानसभा मतदारसंघातील बायोडायव्हर्सिटी पार्क असे अनेक प्रकल्प राबवून महेश दादांनी विकासाची गंगा भोसरी परिसरात आणली आहे हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. बैलगाडा शर्यत असेल किंवा इंद्रायणी नदी सुधारला राज्य आणि केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्याचा विषय असेल त्यासाठी त्यांनी देवेंद्र भाऊंकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याला यशही मिळाला आहे. म्हणूनच ते देवेंद्र भाऊंच्या जवळचे सहकारी ठरले आहेत. मतदार संघातील कार्यक्रम कोणताही असो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच अडीअडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना आर्थिक मदत करणे, रुग्णांना मदत मिळवून देणे, अशी विविध कामे ते केल्याने जनमानसात लोकप्रिय ठरले आहेत.
राजकारणात आणि समाजकारणात महत्त्व अधोरेखित
भोसरी परिसरात होणारी इंद्रायणी थडी असेल किंवा महेशदादा सोशल फाउंडेशनच्या वतीने होणारी रिव्हर सायक्लोथॉन, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल, असे विविध प्रकल्प राबवून त्यांनी आपले पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणा बरोबर समाजकारणाताल स्थान अधोरेखित केले आहे. क्रीडा खेळ हा त्यांचा आवडता विषय त्यासाठी ही ते अत्यंत प्रभावीपणे काम करत असतात खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात.
मला वाटतं एखादा व्यक्तीमत्व कधी लोकप्रिय होत, त्याची नाळ समाजातील विविध घटकाशी जोडली असेल तर. महेश दादांना नगरसेवकपदी आमदार पदी संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनमानसाशी असणारी नाळ अधिक घट्ट केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी आपले वेगळेपण आणि मोठेपण सिद्ध केले आहे. सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे, त्यामुळेच ”विकासाचा वादा महेशदादा” हे बिरूद त्यांच्या ठाई समर्पक ठरत आहे.