महाराष्ट्र आता थांबणार नाही : आमदार महेश लांडगे

पिंपरी : बलशाली महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न घेवून राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. आधुनिक युगाशी स्पर्धा करीत महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार सक्षमपणे काम करील, असा विश्वास वाटतो. भाजपा-शिवसेना-एनसीपी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आता महाराष्ट्र थांबणार नाही. प्रखर हिंदूत्व आणि विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र राज्य भारत देशाला जागतिक महासत्ता घडवण्यासाठी मोलाचे योगदान देईल, यात शंका नाही.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.