फक्त मुद्द्याचं!

29th June 2025
पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने🚩वारकऱ्यांची सेवा ! 🚩

महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने🚩वारकऱ्यांची सेवा ! 🚩

पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भक्तांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत दरवर्षीप्रमाणे यंदाही १२ प्रकारच्या मोफत सेवा पुरविल्या आहे.

सेवा यादी
मोफत रिक्षा सेवा , आरोग्य सुविधा ,चरण सेवा , मोबाईल चार्जिंग सेवा , पाणीपुरवठा, अन्नदान, निवास, स्वच्छता, मार्गदर्शन, आपत्कालीन सेवा, सुरक्षा व्यवस्था, माहिती केंद्र, विश्रांती स्थळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम!
महाराष्ट्र रिक्षा पंचायत** ही सेवा गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे (माऊली) यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून पुणे ते पंढरपूर पर्यंत भक्तीभावाने राबवली जाते.
यंदाही हा उपक्रम भक्ती आणि उत्साहाने राबवला जाणार आहे! महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने आज पिंपरी येथील भक्ती कॉम्प्लेक्स खराळवाडी येथे ही सेवा राबवण्यात आली,!
या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन सेवा आणि भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा कांबळे यांनी केले आहे!
पिंपरी येथील कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य आशा कांबळे, टपरी पथारी हातगाडी पंचायत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रमेश शिंदे, सचिव प्रकाश यशवंते,इस्माईल बागवान, महिला अध्यक्ष नानी गजरमल, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, अनिकेत भालेराव,घरकाम महिला अध्यक्ष रेखा भालेराव, ॲड काजल कांबळे, अंजली तांदळे, महिला रिक्षा चालक यमुना काटकर,आधी यावेळी उपस्थित होते.

viarasmall
viarasmall

पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी
आषाढी वारीनिमित्त पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसर, निगडी गावठाण येथे गुरुवार,दिनांक १९ जून २०२५ रोजी वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासणी आणि औषध वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सुमन पवळे, पोलीस मित्र नागरिक दक्षता संघाचे अध्यक्ष ॲड. रमेश उंबरगे, संस्थापक – अध्यक्ष मनोहर दिवाण, महालिंग शेट्टी, शिवाजी शिर्के, राम सपाटे, रोहिदास वालगुडे, गौरी उत्तुरे, महेश स्वामी, ओंकार पवळे, नंदाराम भागवत, नंदकिशोर जगदाळे, मधुराज पवळे, ज्येष्ठ कवी प्रकाश चव्हाण, राजेंद्र घावटे, अण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, सुरेश कंक आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी माउली गाडे, डॉ. प्राची इंगवले, डॉ. सौरभ शिराळकर, डॉ. अभिनंदन कुमठेकर, सुप्रिया कुमठेकर, हेरंब कुमठेकर, प्रकाश गावडे, ओंकार पोळे, बाळासाहेब गाडे, भीमाशंकर उमरजे, दत्तात्रय दुवा, विजय नाटक, भरत मांडेकर, शिवाजी पवार यांनी यांनी सहकार्य केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"