प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत “कमळ” फुलणार : राहुल कलाटे

विकासाला प्राधान्य देण्याची भाजपची ठाम भूमिका
वाकड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग २५ मध्ये भाजप उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून वाकड ताथवडे पुनावळे भागात भाजप उमेदवार विकासाच्या अजेंड्यावरच मांडणी करत असून विविध ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत संवाद साधत आहेत. प्रभागातील सोसायट्या आणि वस्ती भागातही नागरिकांचा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला वाढता पाठींबा पाहता, प्रभागात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शंभर टक्के कमळ फुलणार असल्याची भावना भारतीय जनता पक्षाचे प्रभाग २५ चे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केली आहे.

प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार सातत्याने विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार करत आहेत. या प्रभागातून राहुल कलाटे यापूर्वी नगरसेवक राहिले असल्याने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देत, राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या प्रचाराप्रसंगी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर देखील राहुल कलाटे यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या विषयांवरच जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. नागरिकही त्यांच्या या भूमिकेबद्दल सकारात्मक असून “विकासच हवा आणि फक्त भाजपच विकास करू शकते” असा विश्वास व्यक्त करत आहेत.
महापालिका निवडणूक ही जनतेच्या विश्वासावर, यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामावर आणि येत्या काळात करायच्या प्रभागाच्या विकासावरच व्हावी असा आमचा मानस असल्याची भावना या चारही उमेदवारांनी व्यक्त केली आहे. तर आमचा प्रभाग विकासाचे मॉडेल बनून समोर येत आहे,

