रोटाफ्री इंडिया कंपनीतील 5 लाख 21 हजार किंमतीचे लॉकिंग असेंब्ली पार्ट चोरीला!

पिंपरी : कंपनी बंद असताना कंपनीतील 5 लाख 21 हजार 357 रुपये किंमतीचे लॉकिंग असेंब्ली पार्ट अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश करून चोरून नेले. ही घटना 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते पंधरा सप्टेंबर 2026 सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रोटाफ्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्लॉट नंबर जी 94, एमआयडीसी फेज थ्री, निघोजे, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी राहुल शहाणाप्पा मण्णे (वय 24, रा. सतीश शहा कुमार यांचे खोलीत भाड्याने, चिंबळी फाटा, कुरळी, मूळ- रा. संगोगी, (ब), अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी काम करत असलेल्या रोटाफ्री इंडिया कंपनी मध्ये ठेवण्यात आलेले एकूण 5 लाख 21 हजार 357 रुपये किंमतीचे लॉकिंग असेंब्ली पार्ट हे कंपनी बंद असल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश करून ते चोरी करून घेऊन गेले. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुले हे तपास करत आहेत.

इलेक्ट्रिक दुकानातून पॉलीकॅब केबल वायर चोरी!
पिंपरी : नेहरूनगर येथील इलेक्ट्रिक दुकानातून 71 हजार 980 रुपये किंमतीची 50 मीटर फेक्झिबल केबल वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार या कालावधीत नेहरूनगर महालक्ष्मी चेंबर येथील साई इलेक्ट्रिकल दुकानत घडली. या प्रकरणी रोजेस शामलाल मुलचंदाणी (वय 46, रा. सी. ब्लॉक8/ 6, वैष्णोदेवी मंदिराजवळ पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे मालकीच्या नेहरूनगर येथील साई इलेक्ट्रिकल दुकानातून 71 हजार 980 रुपये किंमतीची फ्लेकझील केबल 50 मीटर पॉली कॅप केबल वायर अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरून चोरी करून घेऊन गेला. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार वावळ हे तपास करीत आहेत.

