फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पिंपरी-चिंचवड

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आमदार शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आमदार शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी!

आमदार शंकर जगताप सांभाळणार पिंपरी चिंचवडची कमान
पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुका केंद्रस्थानी ठेवत मोठी घोषणा केली. जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करताना पिंपरी चिंचवड शहरातील आगामी निवडणुकांची शहराचे निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक-2025 करिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे

पिंपरी चिंचवड हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र भाजपच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून पिंपरी चिंचवडचा गड भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रस्थापित केला. 2017 मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पिंपरी चिंचवडमध्ये मोठा पक्ष म्हणून पुढे आला. भाजपने तब्बल 77 नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात नेले. भाजपाला पहिला महापौर या शहराला मिळाला.

दरम्यान शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या आणि संघटन कौशल्य, व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे कसब असलेल्या चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्यावर भाजपने विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगताप आगामी निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहराची कमान सांभाळणार आहेत. शहरामध्ये महापालिका निवडणुकीसाठी 128 उमेदवार रिंगणात असणार आहेत.

जगताप यांच्याबद्दल विश्वासाची मोहर
पिंपरी चिंचवड शहराचे नाव विकसित शहरांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. या शहराच्या गरजा, पुढील पन्नास वर्षाचे नियोजन, भाजपाच्या संकल्पनेतील विकसित शहर या दृष्टिकोनातून भाजपला या शहरांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलवायचे आहे. त्या दृष्टीने असलेल्या नेतृत्वाकडे प्रदेश नेतृत्वाने मोठी जबाबदारी दिली आहे. या दृष्टीने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पडतील असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाने जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारी यांची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर मला पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रात “निवडणूक प्रमुखपदी” नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची व अभिमानाची बाब आहे. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. हा विश्वास सार्थ ठरेल याची मी ग्वाही देतो.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"