फक्त मुद्द्याचं!

4th September 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील २७ विसर्जन घाटांवर जीव रक्षकांची नियुक्ती!

पिंपरी चिंचवड शहरातील २७ विसर्जन घाटांवर जीव रक्षकांची नियुक्ती!

गणेश विसर्जन काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून विशेष तयारी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून हा उत्सव ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

viara vcc
viara vcc

गणेशोत्सव काळात विसर्जन घाटांवर होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता, दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यापक नियोजन केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २७ अधिकृत गणेश विसर्जन घाटांवर सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घाटावर जीव रक्षकांसाठी लागणारे साहित्य लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरी, मेगाफोन इत्यादी उपलब्ध करून देण्यात आले आहे. घाटावरील जीव रक्षक नागरिकांना सहज ओळखता यावेत, यासाठी त्यांना अग्निशमन विभागाकडून दिलेले ऍप्रन परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांसह रबर बोट, पथक आणि संपर्क अधिकारी घाट परिसरात सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, विसर्जन घाटांवर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिने काळजी घ्यावी. गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घाटावर गेल्यानंतर नदीपात्रात उतरू नये, लहान मुलांना पाण्याजवळ एकटे सोडू नये, तसेच रेस्क्यू पथक व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अग्निशमन विभागामार्फत करण्यात आले आहे.

जीव रक्षक पथकांचे समन्वय अधिकारी
• किवळेगाव (पवनानदी), रावेत घाट (जलशुद्धीकरण केंद्र), रावेत भोंडेवस्ती (मळेकर) – अनिल डिंबळे – ७२६२०२३३२०
• पुनावळे गाव (राममंदिर), ताथवडे घाट, वाल्हेकरवाडी , प्राधिकरण (गणेशतलाव) – गौतम इंगवले – ९२७०३१६३१६
• थेरगाव पूल नदीघाट, मोरया गोसावी पवना नदी, केशवनगर (चिंचवड घाट) – चंद्रशेखर घुळे – ९९२२२५७९८५
• पिंपरी स्मशानभूमी घाट, सुभाषनगर घाट, काळेवाडी स्मशान घाट – बाळासाहेब वैद्य – ९८२२७७४०४९
• काटेपिंपळे घाट, पिंपळे गुरव , पिंपळे निळख , वकड गावठाण , कस्पटे वस्ती घाट – विजय घुगे – ८८८८८३७५४३
• सांगवी स्मशान घाट, सांगवी दशक्रिया घाट, सांगवी वेताळबाबा मंदिर घाट – सुनील फरांदे – ७३८१८१२७०१
• कासारवाडी स्मशानभूमी घाट, फुगेवाडी स्मशानभूमी घाट, बोपखेल घाट – दिलीप गायकवाड – ९७६७३०५३२४
• चिखली स्मशान घाट, मोशी नदीघाट – विनायक नाळे – ९३७०९१५५७६
• मोशी खाण (इ) प्रभाग – विकास नाईक – ९८५०८९०४०३

अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घाटांवर सतत गस्त ठेवण्यात येणार आहे. आमच्याकडे रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रशिक्षित पथक, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स, अग्निशमन वाहनांवर बोटी आणि बचावासाठी आवश्यक साहित्य तयार आहे. नागरिकांनी देखील सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जन घाटावर गेल्यानंतर पाण्यात खोलवर जाणे टाळावे. मदतीची गरज असल्यास रेस्क्यू पथकाशी तात्काळ संपर्क साधावा. – उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"