फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पिंपरी-चिंचवड

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’;पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक!

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’;पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक!

थेरगाव मनपा शाळेने सादर केलेले “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” ठरले लक्षवेधी
पिंपरी : मुंबई येथील प्रतिष्ठित काळा घोडा फेस्टिव्हल २०२६ अंतर्गत आयोजित चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाली होती. या विभागातील विजेत्या शाळांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा, थेरगाव या शाळेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

थेरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या विषयावर सादर केलेले इन्स्टॉलेशन परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील वापर करून मानवी मनाचा वेग, भावनांची गुंतागुंत आणि आत्मसंयम यांचे प्रभावी प्रतीकात्मक दर्शन या मॉडेलमध्ये घडवण्यात आले आहे. हे मॉडेल सर्वोत्तम ठरले असून थेरगाव शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यशामुळे मनपा शाळांनी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अनेक नामांकित व खासगी शाळांनी सहभाग नोंदवला होता. अशा स्पर्धात्मक वातावरणात महापालिकेच्या शाळेने मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता, कल्पकता आणि मार्गदर्शनाची पावती देणारे ठरले आहे.

या इन्स्टॉलेशनची संकल्पना व निर्मिती कला शिक्षिका मुक्ता पुसाळकर-धोंगडे यांनी केली असून, त्यांना अंशकालीन शिक्षिका स्वाती मदने व दिपाली नवले यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमात सानिका पवार, श्रावणी महापुरे, दिपाली पांडगुळे, अनुजा टोमके, प्रिया होळकर, हुमेरा शेख, यशोदा राठोड, किशोरी वाबळे व समिक्षा डींगरे या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर यांच्यासह शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"