फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
पिंपरी-चिंचवड

तब्बल ४२६ तरुणांना नोकरीची संधी: योगेश बहल यांचा उपक्रम यशस्वी!

तब्बल ४२६ तरुणांना नोकरीची संधी: योगेश बहल यांचा उपक्रम यशस्वी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पिंपरी – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, मा.नगरसेवक अजित गव्हाणे, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, शाम लांडे, फजल शेख, संजय वाबळे, वसंत बोराटे, अनुराधा गोफणे, जितेंद्र ननावरे, प्रकाश सोमवंशी, विजय लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री, बबन गाढवे, शेखर काटे, वर्षा जगताप, चेतन दुधाळ, अक्षय माच्छरे, कविता खराडे, उज्वला ढोरे, मनीषा गटकळ, ज्योती गोफणे, शोभा पगारे, महेश झपके, संजय अवसरमल, श्रीकांत कदम, रवींद्र ओव्हाळ, गोरोबा गुजर, अकबर मुल्ला, रशीद सय्यद, देविदास गोफणे, संपत पाचुंदकर, भरत खरात, शक्रूला पठाण, माऊली मोरे, सतीश लांडगे, युवराज पवार, किरण ढेरे, रोहित कोळेकर, राहुल आडकर, वर्षा शिंदे आदि उपस्थित होते.

सुमारे २ हजार ८४२ हून अधिक पदवीधर युवकांनी ऑनलाईन मुलाखतींसाठी नोंदणी केली, तर १५८८ युवकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात विविध कंपन्यांकडे मुलाखती दिल्या आहेत. त्याद्वारे ४२६ पदवीधरांना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. बहुतांश उमेदवारांना ‘ऑफर लेटर’ उपलब्ध झाले आहेत. कंपनी व्यवस्थापनांकडून ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आगामी काळात होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने राज्याचे नेते तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संत तुकारामनगर, पिंपरी येथे हॅप्पी स्ट्रीट -झुंबा कार्यक्रमाचे आयोजन आले होते, या कार्यक्रमामध्ये बालक, युवक युवती, तरूणंचा, जेष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला.

भव्य वृक्षारोपण – बी.डी.किल्लेदार उद्यान, स्वर्गीय राजेश बहल उद्यान येथे वृक्षारोपन करण्यात आले. अजितदादांच्या वाढदिपसानिमित्त २२ जुलै रोजी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले, त्यामध्ये PWD मैदान या ठिकाणी चिंचवड विधानसभेतील सर्व पदाधिकारी यांच्यावतीने वृक्षारोपन शहराध्यक्ष योगेश बहल आणि विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, शेखर काटे, शाम जगताप, तानाजी जवळकर, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब पिल्लेवार,सतीष चोरमले,उदय ववले स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. काळेवाडी परिसरात मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत मा.नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, मा.नगरसेविका उषा काळे, संगीता कोकणे, भव्य वृक्षारोपन करण्यात आले. पिंपळेनिलख येथे उपाध्यक्ष शिरिष साठे यांच्या वतीने देखील मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपन करण्यात आले. इद्रायणीनगर, भोसरी सी सेक्टर याठिकाणी श्री.अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत मा.नगरसेवक संजय वाबळे आणि प्रकाश सोमवशी यांच्याकडून ६५ झाडे लावण्यात आली. मा.नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावतीने इंदीरानगर परिसरात ६५ झाडे लावण्यात आली. नाना काटे सोशल फाउंडेशन तसेच उमेश काटे युथ फाउंडेशनच्यावतीने पिंपळेसौदागर पुल येथे वृक्षारोपन करण्यात आले. मातृ विद्यालय वाल्हेकरवाडी येथे मा.नगरसेवक राजेंद्र साळुंके यांच्यावतीने ६५ देशी वृक्षांचे रोपन करण्यात आले. मा.महापौर मोहंम्मद पानसरे तसेच मा.नगरसेविका अमिना पानसरे यांच्यावतीने एच ए शाळा परिसरात भव्य वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर उपक्रमास शालेक विद्यांर्थी यांचा देखील प्रतिसाद पाहावयास मिळाला.

विविध स्पर्धा
कॅरम स्पर्धा – जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धा सदर स्पर्धेत एकूण १३६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता, ३ ब्रेक टू फिनिश झाले. प्रथम-रहीम खान, द्वितीय- निकुल काकडे,तृतीय-अभिजित त्रिपणकर,चतुर्थ-योगेश परदेशी,पाचवा-अनिल मुंढे,सहावा-गणेश तावरे,सातवा-अनुराग दुबळे,आठवा-हरून शेख. यावेळी माजी महापौर व शहराध्यक्ष योगेश बहल, शिक्षण मंडळ माजी सभापती फजल शेख ,माजी उपसभापती शिक्षण मंडळ मायला खत्री, सुशिल गुजर सेक्रेटरी, सदस्य श्री अविनाश कदम, हरपीत सिंग, राजेश दिक्षित, आंतर राष्ट्रीय पंच राम पडगीळ, सहपंच विष्णू भुते, अमोल चव्हाण, सचिन पिंगळे, मुकेश इंगूळकर, विनोद देसाई, अनंत भुते हे उपस्थित होते.

बुद्धिबळ स्पर्धा
दुसरी फिशर रँडम ( चेस ९६० ) व वयोगटातील पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धा : खुल्या गटात आदित्य जोशीला विजेतेपद स्व. राजेश बहल स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशन व योगेश बहल मित्रपरिवार यांनी पिंपरी चिंचवड महानगर चेस असोसिएशनच्या सहकार्याने घेतलेली बुद्धिबळ स्पर्धा काल भोसरी येथे संपन्न झाली. पुणे जिल्ह्यतील एकूण ३१० खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळाला. .श्री.योगेशजी बहल व मा.श्री.विलासजी लांडे यांनी पटावर चाल करुन स्पर्धेचे औपचारिकरीत्या उद्घाटन केले आदित्यला विजेतेपदाचा चषक व रुपये ७०००/- रोख बक्षीस मिळाले. तसेच अविरतला चषक व ६०००/- रुपयाचे पारितोषिक मिळाले. आद्विक अग्रवाल आणि गौरव बाकलीवाल यांचे सामान साडेसहा गुण झाले. टायब्रेक गुणानुसर अद्विकला तृतीय व गौरवला चतुर्थ स्थान प्राप्त झाले. भुवन शितोळे ,साहिल सेजल , विकास शर्मा, अक्षय जोगळेकर, अर्णव कदम व अपूर्व देशमुख यांनी अनुक्रमे ५ ते १० क्रमांकाचे यश प्राप्त केले. सर्व गटात मिळून विजेत्या खेळांडूना एकूण रु 80000 रोख, 43 सन्मानचिन्हे व 99 पदके प्रदान करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड मतदार संघात १) पिंपळे सौदागर येथील शंभो महादेव मंदीरात नाना काटे सोशल फाउंडेशन व उमेश काटे युथ फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, येथे १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. २) नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरामध्ये शराध्यक्ष योगेश बहल, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी समिती मा.अध्यक्ष प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, शाम जगताप, तानाजी जवळकर, सुषमा तनपुरे, उज्वला ढोरे, तृप्ती जवळकर, यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ३)रहाटणी येथे युवानेते सागर कोकणे, चंद्रकांत तापकिर, अश्विनी तापकिर, सुमित डोळस यांच्यावीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले यात ४५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ४) थेरगाव परिसरात ग्रामदैवत बापूजी बुवा मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन मा.नगरसेवक कैलास बारणे, गोरक्षनाथ पाषाणकर, संभाजी बारणे, युवा नेते प्रशांत सपकाळ, विशाल पवार, शरद बारणे यांनी केले, नागरिक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला येथे २१५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सौ.विजया काटे यांच्यामार्फत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यात जेष्ठ नागरिकांचा सह महिलांनी देखील आपली तपासणी करुन घेतली.

चित्रकला स्पर्धा व इ.१० वी व १२ वी गुणवंताचा सत्कार समारंभ
प्रेरणा माध्यमिक विद्यालय, वाल्हेकरवाडी, येथे विद्यार्थ्यानकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन मा.सभापती श्रीधर वाल्हेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक आगम सर सहकार सेल चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, स्पर्धेत सहभागी व निवड झालेल्या विद्यर्थ्यांचा आकर्षक पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

थेरगाव परिसरातील इ.१० वी व इ.१२ वी मधील गुणवंताचा सत्कार समारंभ तसेच खाजगी व प्राथमिक, माध्यमिक शाळेमध्ये संयुक्त चित्रकला स्पेर्धेचे आयोजन शहर कार्याध्यक्ष संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्यावतीने घेण्यात आले व त्यांचा गुण गौरव विषेश पारितोषिक देऊन करण्यात आला.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर येथे आदरणीय अजितदादा पवार तसेच योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी शालेय साहित्य वही वाटप तसेच शिक्षक

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"