फक्त मुद्द्याचं!

15th February 2026
पिंपरी-चिंचवड

 महादेवी हत्तीणीला परत मिळण्यासाठी जैन समाजाकडून निगडीत निदर्शने!

 महादेवी हत्तीणीला परत मिळण्यासाठी जैन समाजाकडून निगडीत निदर्शने!

अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
निगडी : महादेवी हत्तीणीला परत मिळण्यासाठी जैन समाजाकडून अंबानीच्या विरोधात निगडीत निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट चे अध्यक्ष अजित पाटील , महिला मंडळ, वीरसेवा दल निगडी, शांतिसागर पाठशाला असंख्य श्रावक,श्रविका,विद्यार्थी यांनी केली.

viara vcc
viara vcc

गेल्या आठवड्यामध्ये नांदणी मठ (ता. शिरोळ,जि कोल्हापूर) येथे महादेवी मठातून घेऊन गुजरात मधील अंबानीच्या वनतारारामध्ये हलविण्यात आली आहे. गेली 35 वर्षे महादेवी मठात वाढलेली आहे. या मठामध्ये गेली 700 वर्ष हत्तीण किंवा हत्ती असल्याचे मठाची जुनी परंपरा आहे.परंतु धन दांडग्यांच्या हट्टपायी, पेटा सारख्या संस्थेचा गैरवापर करून माधुरी हत्तीनीची देखभाल व्यवस्थित होत नाही अशी कारणे दाखवणे या हत्तीनीला वनतारा या गुजरातमधील अंबानींच्या खाजगी वनात नेण्यात आले आहे. संपूर्ण नोंदणी गाव (सर्व,जाती,धर्म,पक्ष वरहित) तसेच कोल्हापूर सांगली जिल्हा या विरुद्ध पेटून उठला आहे. त्यांच्या लोकभावनेचा कोणताही विचार केला गेला नाही. प्रत्येक गावाने यासाठीचे निषेध पत्रक ,ठराव प्रत्येक गावातून सरकारकडे पाठवले आहेत.

याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड मधील जैन समाज फारच दुःखी झाला आहे व यांच्या निषेध म्हणून रविवार 3 जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरातील महिला मंडळाने देखील अंबानीच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. माधुरीला त्वरित मठात आणून सोडावे अशी घोषणा देऊन अंबानीच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेत व्यक्त केला. यावेळी अंबानीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकून त्यांचे कोणतेही उत्पादन वापरायचे नाही. अशी शपथ घेण्यात आली..

एक मुका प्राणी मठ सोडत असताना त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे पाहून नागरिकच नव्हे तर परिसर आणि निसर्ग देखील हळवा झाला होता. नांदणी मंडळाच्या परंपरेला तडा देण्याचे काम धनाच्या जोरावर अंबानी करीत असल्याचा आरोप पशु प्रेमींनी केला. आमची लाडकी हत्तीण माधुरीला लवकरात लवकर आमच्या मठाच्या स्वाधीन करावे अशी विनंती आम्ही शासनाकडे देखील करीत आहे याची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"