मावळात शेळके आणि भेगडे यांची चुरशीची लढत

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मावळात विधानसभा मतदार संघात सहा लढती होणार हे स्पष्ट झाले आहे. तरी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान आमदार सुनील शंकरराव शेळके आणि अपक्ष उमेदवार आण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांच्यातच अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मावळ विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख व प्रबळ इच्छुक उमेदवार स्वर्गीय आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे रवींद्र आण्णासाहेब भेगडे व माजी आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे यांच्या सुनबाई सुरेश्वरी मनोजकुमार ढोरे यांच्यासह सहा उमेदवारांनी आप आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे मावळात सहा रंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहेत.


मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत सहा जणांचे उमेदवारी अर्ज बाद (अवैध) झाल्याने उर्वरित १२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. अर्ज माघारीच्या कालावधीत सहा उमेदवारांनी आप आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख व प्रबळ इच्छुक उमेदवार स्वर्गीय आमदार दिगंबर भेगडे यांचे पुतणे रवींद्र आण्णासाहेब भेगडे व माजी आमदार श्रीमती रुपलेखाताई ढोरे यांच्या सुनबाई सुरेश्वरी मनोजकुमार ढोरे यांच्यासह विधान सुधीर तरफदार, दादासाहेब किसन यादव, रुपाली राजेंद्र बोचकेरी, संतोष रंजन लोखंडे यांनी आप आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असल्याची माहिती मावळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.
मावळमधील लढती
सुनील शंकरराव शेळके – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (घड्याळ)
आण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे – अपक्ष ( पिपाणी)
रवींद्र नानाभाऊ वाकचौरे -भीमसेना (ऑटो रिक्षा)
मुकेश मनोहर अगरवाल -अपक्ष (कपाट)
गोपाळ यशवंतराव तंतरपाळे – अपक्ष (गॅस सिलेंडर)
पांडुरंग बाबुराव चव्हाण – अपक्ष (शिट्टी)