फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
विधानसभा २०२४

मतदारांनो, `फेक कॉल` ओळखा! सावध रहा!

मतदारांनो, `फेक कॉल` ओळखा! सावध रहा!

पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार; राहुल कलाटे समर्थकांकडून तक्रार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
चिंचवड, प्रतिनिधी : हॅलो.. मी डॉ अमोल कोल्हे बोलतोय!, येत्या निवडणूकीत शंकर जगताप यांना मतदान करा..असा फोन तुमच्या मोबाईलवर आलाय का? आला असेल तर आत्ताच सावध व्हा. कारण हा फेक कॉल आहे. अशा प्रकारे मतदानाचे आवाहन करणारा फेक फोन कॉल चिंचवडमधील मतदारांना येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे समर्थकांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.

मोबाईलद्वारे फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आपण आतापर्यंत ऐकले असतील. अनेकांनी अशा कॉल्सद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकारही अनुभवला असेल किंवा ऐकला असेल. असेल पण, आता महायुतीच्या उमेदवारांकडून थेट मतदारांना स्टार प्रचाराकांच्या नावे फेक कॉल करून दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्रू कॉलरवर नाव येत असल्याने मतदार उत्सुकतेने तो कॉल घेत आहेत. मात्र, फोन घेताच महायुतीच्या शंकर जगताप यांना मतदान करण्याची विनंती ते करत आहेत.

याबाबत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना शंका आली. त्यांनी याबाबत खातरजमा केली असता हा सर्व फेक कॉल आणि फसवणूकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यलय गाठून याबाबत तक्रार दिली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांचे प्रतिनिधी रोहन जाधव यांनी सांगितले की, चिंचवड विधानसभा मतदार संघामधील काही विरोधी उमेदवारांनी हा प्रकार घडवून आणला आहे. त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावाचा वापर करून फेक कॉलद्वारे मतदारांची फसवणूक व दिशाभूल केली आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशताना त्यांच्याकडून भाजपाचा प्रचार केला जात असल्याचं मतदारांना भासवलं जात आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी.

या प्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे म्हणाले की, महाविकास आघाडीसमोर आपला पराभव अटळ असल्याचे जाणून आता विरोधी गटातील उमेदवारांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. पराभव कमी फरकाने व्हावा म्हणून आता अशा फसवणुकीचे प्रकार घडवून आणत आहेत. पण जनता या कृत्यांना भीक घालणार नाही. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"