इस्रायल ने इराणच्या अनुकंद्रावर मोठा हल्ला!

इराणचे सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद वाघेरी मारले गेले
नवी दिल्ली : इस्रायल ने इराणवर मोठा हल्ला केला असून इराणच्या राजधानी तेहरान मध्ये बॉम्बचा वर्षाव केला आहे. इराणच्या लष्करी ठिकाणांना तसेच अनुकंद्रांनाही लक्ष केले आहे . इराणी मीडिया च्या माहितीनुसार तेहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले , . इस्रायलच्या माहितीनुसार तेहरांमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याच्या शक्यतेमुळे तेथे आणीबाणी घोषित केली जाऊ शकते . इस्रायलच्या लष्कर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने इराणमधील सैन्य ठिकाणी तसेच अनुकेंद्रावर हल्ला केला आहे . इस्रायल ने इराण साठी अनुदान बनवणाऱ्या शास्त्रज्ञानावरही हल्ला केला आहे असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतण्याहू यांनी स्पष्ट केले आहे .अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचेही नेतन्याहू यांनी आभार मानले आहेत .राष्ट्रपती ट्रम्प चे नेतृत्व आणि यांच्या अनु कार्यक्रमाचा सामना करण्यासाठी आभार मानले .

इस्रायल ने इराणवर ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून यामध्ये इराणचे सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद वाघेरी आणि इस्लामिक रेवोल्युशनरी गार्ड कॉप्स चे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणने प्रसिद्ध केली आहे . इराणला अण्वस्त्र संपन्न देश बनू देणार नाही, हे इस्रायल आधीपासूनच सांगत आहे . त्यामुळेच त्यांनी इराणवर मोठा हल्ला केला . इराणी लष्करी आणि अनुताळांना देखील इस्रायलने टारगेट केले आहे .सध्याच्या घडीला इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ आहे . इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणातील विनाशकारी शस्त्र इस्रायल राष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत असे इस्रायलचे म्हणणे आहे .याला अमेरिकेने देखील गेल्या काही वर्षापासून पुष्टी दिली आहे . त्यांनी देखील इराणला बनवू नये यासाठी आग्रह धरला होता मोहम्मद वाघेरी मारले गेले.
इराणच्या दोन अनु वस्त्र वैज्ञानिकांचा मृत्यू झाला आहे यामुळे इराणच्या अणुबॉम्ब विकसित करण्याच्या कार्यक्रमाला बाधा येणार आहे .
.