पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे स्वगृही परतण्याच्या मार्गावर?

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचे नेते आणि मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आज शहरात सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी वाघेरे यांच्याबरोबर यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे .

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारीसाठी शिवसेना उबाटा गटात प्रवेश करून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली .या निवडणुकीत त्यांना सुमारे साडेपाच लाख मते मिळाली.त्यानंतर पक्षप्रमुख ठाकरे यांनी वाघेरे यांच्या वर पक्ष संघटनेची विशेष जबाबदारी सोपवून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला.मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाघिरे यांचे मन शिवसेनेत रमत नसल्याचे दिसून येत आहे.त्यांचे जुने सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याने त्यांचे मन शिवसेनेत रमत नाही असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.याचाच फायदा घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी संजय वाघेरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम करून चर्चेला उधाण दिले आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांचा राजकीय पिंड हा काँग्रेस पक्षाचा आहे.त्यांचे वडील भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवडचे महापौर होते.त्यांचाच वारसा संजय वाघिरे हे पुढे चालवत आहेत.लोकसभेची निवडणूक लढवायची असल्याने ते उद्धव ठाकरे यांच्या उबाटा पक्षात प्रवेश करून आपली इच्छा पूर्ण केली.संजोग वगैरे यांच्या स्नेह भोजन कार्यक्रमाने आता वेगळी चर्चा शहरात सुरू झाली आहे.पिंपरी चिंचवड महापालिका 2017 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती.
मात्र भारतीय जनता पक्षाने दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने ही सत्ता राष्ट्रवादी कडूनकाढून घेतली.तेव्हापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालिकेत आपली पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी महापालिकेत लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.विविध विकास कामांची उद्घाटने,सत्कार समारंभ कोर्यक्रमास हजेरी लावून नाराज मंडळींना आपल्या पक्षात घेऊन अजित पवार हे महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.त्यामुळेच नाराज संजोग वाघेरे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. या चर्चेबाबत संजोग वाघेरे पाटील यांच्याशी संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.