फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

बनावट ट्रेडिंग ॲप मध्ये गुंतवणूक; 95 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक!

बनावट ट्रेडिंग ॲप मध्ये गुंतवणूक; 95 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : मोठ्या परताव्याचे आमीष दाखवून एका व्यक्तीला बनावट ट्रेडिंग ॲप मध्ये गुंतवणूक करायला लावून 95 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 25 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान अपेक्स अथिना सोसायटी, वाकड येथे घडली. याप्रकरणी राकेश कुमार तिवारी (वय 46, रा अपेक्स अथिना सोसायटी, वाकड) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

त्यानुसार इंड निव ॲप्लीकेशन धारक आणि तान्या गिल नावाचे व्हाट्सअप खाते वापरणाऱ्या व्यक्तीसह विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला व्हाट्सअप वरून संपर्क साधून इंड निव प्रो नावाच्या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग ॲपची माहिती दिली. त्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल असे सांगून फिर्यादी कडून 95 लाख वीस हजार रुपये गुंतवून घेतले. ॲपवर पाच कोटी 76 लाखांचा आभासी नफा दाखवून तो काढण्यासाठी अधिक पैशाची मागणी केली. शेवटी गुंतवलेले पैसे आणि नफा काहीच परत न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली .सायबर पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"