फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पुणे

अवजड वाहनांच्या चालकांची तपासणी करण्याचे निर्देश!

अवजड वाहनांच्या चालकांची तपासणी करण्याचे निर्देश!

पीएमआरडीए मधील बैठकीत महत्त्वपूर्ण न‍िर्णय; रहदारीच्या वेळेत अवजड वाहने नको
पुणे : हिंजवडीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी अवजड वाहने पोलीस यंत्रणेने निर्धारित केलेल्या वेळेतच शहरात यायला हवी. यासह बांधकाम व्यवसायिकांनी याबाबत खबरदारी घेत ज्या भागात त्यांची बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी रहदारीच्या नियमांचे पालन करत संबंधित वाहन चालक कुठल्या नशेत नसल्याची खात्री करूनच त्याचे परवाने अध्यायवत असलेल्याबाबत खात्री करूनच एकत्रित माहिती विकासकाने त्याच्या प्रकल्पसाइटवर अद्यावत ठेवावी, असे निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी कार्यालयात झालेल्या अधिकारी आण‍ि बांधकाम व्यवसायिकांच्या बैठकीत व‍िव‍िध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली

viara vcc
viara vcc

सध्या शहरालगत असलेल्या हिंजवडी – माण, म्हाळुंगे परिसरात अनेक बांधकाम व्यवसायिकांच्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी बांधकाम करताना संबंधितांना अवजड वाहनांद्वारे सिमेंट, स्टील आदी साहित्यांची वाहतूक करावी लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित वाहनांपासून सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. संबंधित अपघात टाळण्यासाठी पीएमआरडीएने सोमवारी हिंजवडी – माण, म्हाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिकांच्या प्रतिनिधींची बैठक घेत अवजड वाहनांबाबत पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात आणावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

आयटीनगरी असलेल्या हिंजवडी – माण भागात सकाळी आण‍ि सायंकाळी दुचाकीसह चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. यादरम्यान बऱ्याचदा बांधकाम व्यवसायिकांची अवजड वाहने या मार्गावर धावत असल्याने इतर वाहनचालकांना अडचणी येतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार सोमवारी विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्यासह हिंजवडी – माण, महाळुंगे भागातील बांधकाम व्यवसायिक यांच्या प्रतिनिधी व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम व्यवसायिकाचे काम थांबवणार
हिंजवडी भागात शुक्रवारी काँक्रीट मिक्चरखाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवला असून याआधारे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संबंधित वाहन ज्या ठिकाणी काम करण्यासाठी जात होते, त्या ठिकाणची बांधकाम परवानगी रोखणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"