फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘उद्योग सुविधा कक्ष’!

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘उद्योग सुविधा कक्ष’!

व्यवसाय सुलभतेसाठी एकात्मिक प्रणाली – गुंतवणूकदारांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. राज्य सरकारच्या ‘१०० दिवसांचा ‘कृती आराखडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गुंतवणूक प्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘व्यवसाय सुलभता’ संकल्पनेवर आधारित ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

उद्योग सुविधा कक्षाचा उद्देश महानगरपालिका व स्थानिक उद्योगधंद्यांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि शहराच्या विकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे.
‘उद्योग सुविधा कक्षाची’ प्रमुख उद्दिष्टे
 औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे.  व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचे निराकरण करणे. गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे.

महानगरपालिकेच्या या कक्षाद्वारे राबवले जाणारे विविध उपक्रम
१. ‘एक खिडकी योजना’ – उद्योग-सारथी पोर्टल
 महानगरपालिकेच्या वतीने ‘उद्योग-सारथी’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नोदंनी करिता पोर्टल लिंक – https://publicptaxpcmc.in/ifc/index.php किंवा महानगरपालिकेच्या वेबसाईट पेज वर IFC बोक्स वर क्लीक करावे.
 व्यापारी, उद्योग संघटनांसाठी “तक्रार निवारण” / ‘Grievance Redressal’ पोर्टल कार्यान्वित.
 या पोर्टलद्वारे उद्योग-धंदा परवाना, तसेच इतर स्थानिक सुविधां व सेवां बाबतच्या तक्रार नोंदविता येईल .
 उद्योगांकडून सूचना मागवण्यासाठी पोर्टलवर ‘Suggestion Box’ उपलब्ध.
२. ‘निरंतर संवाद कार्यक्रम’ – उद्योग व प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय
 उद्योग प्रतिनिधी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये मासिक बैठकांचे आयोजन करून स्थानिक समस्यांवर चर्चा व त्यांचे निराकरण.
 आयुक्त स्तरावर त्रैमासिक बैठकांचे आयोजन, जिथे एमआयडीसी, पोलीस प्रशासन व राज्य शासनाशी समन्वय साधून आवश्यकते नुसार धोरणात्मक चर्चा केली जाईल.
३. कायदा व सुव्यवस्था समन्वय
 उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदार उद्योजकांसाठी पोलीस प्रशासनासोबत आवश्यक समन्वय व त्रैमासिक बैठकांचे आयोजन.
 व्यवसाय-सुलभता वाढवण्यासाठी नियमांचे पालन आणि गुंतवणुकीस सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.
४. स्थानिक उद्योग सहभाग आणि सीएसआर उपक्रम
 महानगरपालिकेच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांमध्ये (सीएसआर) उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष उपक्रम.
 औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मदत करणाऱ्या सीएसआर प्रकल्पांसाठी समन्वय व मार्गदर्शन.
५. औद्योगिक प्रशिक्षण व सहयोग
 मध्यम व लघु उद्योगांसाठी महानगरपालिकेचे ऑटो क्लस्टर व इतर औद्योगिक संस्थांसोबत समन्वय साधून तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन.
 कामगार आणि उद्योजकांसाठी शासकीय कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकास यासंदर्भात माहिती व सुविधा उपलब्ध करणे.

viara ad
viara ad

‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील औद्योगिक विकाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘उद्योग सुविधा कक्ष’ हा स्थानिक उद्योग व प्रशासन यांच्यातीलमहत्त्वाचा दुवा ठरेल. या उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना पारदर्शक व वेगवान सेवा मिळेल आणि व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल. महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून औद्योगिक अडचणी सोडवण्यासाठी हा कक्ष प्रभावी भूमिका बजावेल’. शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“उद्योग सुविधा कक्ष’ आणि ‘उद्योग-सारथी’ पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल यंत्रणेद्वारे उद्योगांसाठी सुलभ आणि पारदर्शक सेवा पुरवली जात आहे. या प्लॅटफॉर्मद्वारेमहानगरपालिके मार्फत उद्योग-धंद्यांना देण्यात येणारे आवश्यक त्या सुविधा व परवानग्या ऑनलाईन उपलब्ध होतील, तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट संवादाची संधी देखील उपलब्ध होईल. अशाप्रकारे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय सुलभतेसाठी महापालिका अधिकाधिक सुविधा विकसित करण्यावर भर देत आहे. अधिक माहितीसाठी उद्योग प्रतीनिधीनी महानगरपालिकेच्या चौथ्या मजल्यावरील ‘‘उद्योग सुविधा कक्ष’ किंवा g.sarthi@pcmcindia.gov.in या email id वर संपर्क साधावा” – निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"