पर्यावरण प्रेमींचे इंद्रायणी प्रदूषण मुक्त अभियान

पिंपरी : मोशी येथे पर्यावरण प्रेमींनी इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चला एक पाऊल इंद्रायणीकडे अभियान काल रविवारी राबवले.या अभियानात इंद्रायणी नदीपात्रातून शेकडो मूर्त्या ,कुजलेले कपडे व खराब झालेले फोटो काढले व इंद्रायणी नदी पात्राची स्वच्छता केली.
प्रशांत राऊळ यांनी तेथील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.त्या व्हिडिओस इंद्रायणी जल प्रदूषण व गणपती विटंबना नाव देण्यात आले आहे.त्यात ते म्हणाले , तुम्हाला वाटेल नदी दाखवत आहे. परंतु गटार आहे ना?.ही आहे आमची इंद्रायणी माता.वाळू उपसा करून सगळीकडे खड्डे खड्डे काढले आहे. वाळू उपसा करून बिल्डर श्रीमंत झाले आहेत. नदीमध्ये सगळीकडे गटारीचे पाणी सोडले .एस टी पी ,ए टी पी फक्त नावाला म्हणून ठेक्केदार मोठे केले. या गटारींमध्ये श्रींच्या मूर्ती विसर्जित केल्या. अनेक मूर्त्यांची विटंबना झाली आहे .
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जनमोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त पर्यावरण प्रेमींनी आणि अध्यात्मातील साधकांनी वर्षभर इंद्रायणी माता आणि चंद्रभागा नदी प्रदूषण रोखणे कामे स्वच्छता अभियान राबवावे,असे आवाहन इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी केले.
यावेळी येथील इंद्रायणी नदी पात्राची स्वच्छता करण्यासाठी आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशन,पिंपरीतील ग्रीन आर्मी,इंद्रायणी जलमित्र अशा पर्यावरण प्रेमी संघटना एकत्र येऊन इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चला एक पाऊल इंद्रायणी कडे अभियान राबवून इंद्रायणी नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली.यामध्ये विठ्ठल शिंदे ,प्रशांत राऊळ,प्रकाश जुकंटवार,विजय सूर्यवंशी, विपुल कासार, विजय शेवाळे, संदीप शर्मा, हरीश कुलकर्णी, राजेश भट, हरी अय्यर, जयसिंग भाट, गौतम कांबळे, श्रीकांत सावंत, सोमनाथ मोरे, विनायक लिमकर, संतोष मादर, नितीन गायकवाड, सचिन परुळेकर, राजेश पालवे,प्रकाश चक्रनारायण उपस्थित होते तसेच या अभियानात मनसे कार्यकर्त्यांनीदेख सहभाग घेतला होता.