फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी संवर्धन: ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने मतभेद विसरुन एकत्र या!

इंद्रायणी संवर्धन: ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या साक्षीने मतभेद विसरुन एकत्र या!

नाहक राजकीय टीका शिव- शंभूप्रेमी आता खपवून घेणार नाही
पिंपरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’वरुन मागील काळात अनेकांनी राजकीय टीका केली. बिनबुडाचे आरोप केले. मात्र, जे मागे झाले ते सर्व आपण विसरुन सर्वांनी शहराच्या पर्यावरणावरील संकट दूर करण्यासाठी शंभूराजाच्या विचारांची एकत्र आले पाहिजे, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र आणि डब्ल्युटीई फाउंडेशनच्या पुढाकाराने इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025 चे आयोजन करण्यात आले. त्याला सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार लांडगे बोलत होते.

आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी झाले- गेले विसरुन सर्वांनी एकत्र आले पाहिजे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांनी संपूर्ण जगाला आदर्श निर्माण केला आहे. पवित्र कार्यावरुन राजकीय हेतुने कोणी खोटे आरोप केले, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा गर्भीत इशाराही आमदार लांडगे यांनी दिला.

इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विश्वविक्रमी ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ 9 वे पर्व यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. यावर्षी प्रथमच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ च्या आवारात हा उपक्रम यावर्षीपासून घेणार आहोत. ‘हिंदुभूषण’ स्मारकाची उभारणी सुरू असताना अनेकांनी राजकारण आणि खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे साद आमदार लांडगे यांनी घातली.

इंद्रायणी संवर्धनासाठी राज्य सरकार सकारात्मक…
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्यामाध्यमातून नदीला गतीवैभव देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे आणि सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आगामी 15 दिवसांत त्याची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रशासन आणि राज्य शासन नदी संवर्धनासाठी काम करीत आहे. मात्र, याला लोकचळवळ करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तो संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. सलग 9 वर्षे सायकलपटू या मोहीमेत सहभागी होत आहेत. त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही आमदार लांडगे म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभे करु शकलो. त्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाबाबत कृतज्ञता व्यक्त करतो. स्मारकाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासह जगभरात सुरू झाली आहे. याचा मनोमन अभिमान वाटतो. मात्र, यापुढील काळात या पवित्र स्मारकाबाबत खोटे आरोप कदापि सहन करणार नाही. या स्मारकातून प्रेरणा घेवून सशक्त हिंदू तरुणांची पिढी तयार व्हावी, अशी माझी भावना आहे. राजकीय उद्देशाने केलेल्या आरोपांना आता जशास-तसे उत्तर देण्याची भूमिका राज्यातील शिव-शंभूप्रेमी घेतील असा इशारा आमदार लांडगे यांनी दिला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"