शिखर धवनचा क्रिकेटला रामराम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भारतीय क्रिकेट संघाचा झुंजार सलामीवीर आणि आश्वासक क्रिकेटपटू असलेला फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून आज निवृत्तीची घोषणा केली आहे.
शिखर धवनने आज सकाळी सोशल मीडियावरून माहिती देत ही निवृत्तीची घोषण केली आहे. शिखर धवनच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले आहे.
शिखरने २०१० मध्ये क्रिकेट विश्वात पदार्पण केले. मागच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी – २० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. मी आता मागे वळून पाहिले तर मला खूप आठवणी दिसतात आणि भविष्याकडे पाहिले की मला पूर्ण जग दिसते, असे त्याने निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे.