राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा!

पिंपरी : भारताच्या ७९ वा स्वातंत्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, येथे ध्वाजारोहण करुन तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.. शहराध्यक्ष, महापौर .योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी .योगेश बहल आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही देश आहे. भारतदेशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याच्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, ॲड.गोरक्ष लोखंडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, मा.उपमहापौर मोहंम्मद पानसरे, मा.नगरसेवक दत्तोबा लांडगे, गोरक्षनाथ पाषाणकर, .सभापती विजय लोखंडे, मायला खत्री, विनायक रणसुभे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र सिंग वालिया, सेवादल अध्यक्ष महेश झपके, खजिनदार दिपक साकोरे, ओबीसीचे अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, अकबर मुल्ला, शहर उपाध्यक्ष अमोल भोईटे, महिला चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, प्रवीण गव्हाणे, शक्रुल्ला पठाण, रवींद्र सोनवणे, अक्षय माछरे, युवराज पवार, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, बाळासाहेब पिल्लेवार, तुकाराम बजबळकर, सरचिटणीस माधव बिराजदार, महेश माने, राजू चांदणे, भाग्यश्री मस्के, , सुनिल अडागळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यांदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.