पॅरालिम्पिकमध्ये भारताला २१ पदके

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पॅरिस : सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारी याने रौप्य पदक मिळविल्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता २१ झाली आहे. गोळाफेकीच्या एफ४६ या गटातील स्पर्धेत सचिन याने रौप्य पदक मिळविले आहे. २१ पदकांमध्ये भारताने ५ सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा ब्राँझ पदकांची कमाई केली आहे.
सचिन याने बुधवारी १६.३२ मीटर ही सर्वोत्तम फेक केली. मे महिन्यात जागतिक पॅराअॅथलेटिक्स स्पर्धेत १६.३० मीटर या आशियाई विक्रमी कामगिरीसह त्याने सुवर्णपदक जिंकले होते. त्याने यापेक्षा सरस कामगिरी करताना पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये त्यानं १६.३२ मीटर अंतरावर गोळा फेकला. पॅरालिम्पिकमध्ये चमकणाऱ्या सगळ्याच खेळाडूंचे भारतीयांकडून कौतुक होत आहे. सरस तयारी करून प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत जिद्दीने पदक मिळविण्याच्या इछ्छेने उतरले आहेत. त्यामुळे भारताच्या खात्यातील पदकांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.