फक्त मुद्द्याचं!

7th April 2026
पिंपरी-चिंचवड

नियोजनबद्ध, काटेकोर अंमलबजावणीमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ : महापौर लांडगे

नियोजनबद्ध, काटेकोर अंमलबजावणीमुळे मालमत्ता कर संकलनात वाढ : महापौर लांडगे

कर संकलन १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान
पिंपरी : नियोजनबद्ध कामकाज, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे,या यशामागे करसंकलन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अविरत श्रमदान आणि जबाबदारीने केलेले काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ तसेच आगामी आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिल वाटप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिला बचत गटांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.

उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसदस्या सुलभा उबाळे,निकिता कदम, सारिका मासुळकर, नीता पाडळे यांच्यासह महापालिका उपायुक्त सचिन पवार,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह करसंकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला सदस्या आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “शहराच्या प्रगतीत महिलांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असून मागील वर्षी महिलांमार्फत केलेल्या नियोजनबद्ध बिल वाटपामुळे यंदा मालमत्ता कर वसुलीत सकारात्मक वाढ झाली आहे. नागरिकांना कर वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र महापालिकेने ‘अभय योजना’ राबवून मोठ्या प्रमाणात दिलासा दिला. बचत गटातील महिलांना केवळ ४० दिवसांपुरता रोजगार न देता त्यांना वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. अभय योजनेलाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ७० हजार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असे देखील महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, विक्रमी कर वसुलीसाठी १८ विभागीय कार्यालयांमध्ये ‘परफॉर्मर ऑफ द डे’सारख्या स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे सर्व विभागीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि स्पर्धात्मक पद्धतीने काम केले, ज्याचा सकारात्मक परिणाम करसंकलनावर दिसून आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील एकमेव महापालिका आहे जी बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिल वाटप करत आहे. बचत गट ही देशातील एक मोठी सामाजिक-आर्थिक चळवळ असून या गटातील महिलांनी कर आकारणी व संकलनाबरोबरच महापालिकेच्या इतर विभागांतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शहरातील बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘अर्बन सरस महोत्सवा’सारखे उपक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

विभागीय कार्यालयांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
कर आकारणी व करसंकलन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलन मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ विभागीय कार्यालयांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी-वाघेरे, पिंपरी नगर, मनपा भवन, फुगेवाडी-दापोडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे, दिघी-बोपखेल, वाकड व कस्पटेवस्ती या विभागीय कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"