फक्त मुद्द्याचं!

3rd September 2025
पिंपरी-चिंचवड

शहराध्यक्ष .शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन!

शहराध्यक्ष .शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन!

पिंपळे सौदागर साई साहेब सोसायटीचा आदर्श उपक्रम, सौरऊर्जेच्या वापराला दिले प्रोत्साहन
 पिंपरी : पिंपळे सौदागर परिसरातील साई साहेब सोसायटी येथे उभारण्यात आलेल्या,35 KW क्षमतेचे नूतन सोलर पॅनल प्रकल्पाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते पार पडले.

सोसायटीच्या रहिवाशांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वीज बचतीसाठी पुढाकार घेतला असून, या प्रकल्पामुळे केवळ वीज खर्चात बचत होणार नाही तर हरित ऊर्जा वापराच्या माध्यमातून स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीस देखील मदत होणार आहे.

viara vcc
viara vcc

उद्घाटन प्रसंगी बोलताना . शत्रुघ्न काटे म्हणाले, “सौर ऊर्जा ही आजच्या काळाची गरज आहे.ऊर्जासंकटावर मात करण्यासाठी आणि पर्यावरण वाचविण्यासाठी प्रत्येकाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. साई साहेब सोसायटीने जो पुढाकार घेतला आहे, तो खरोखर कौतुकास्पद असून इतर सोसायट्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.

या वेळी सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, या प्रकल्पामुळे वीज बचत तर होणारच, पण पुढील पिढीसाठी स्वच्छ पर्यावरण टिकवून ठेवण्यास मदत होईल.

याप्रसंगी उपस्थितांनी सोलर पॅनल प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. हा उपक्रम परिसरातील इतर सोसायट्यांसाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन .श्रेयस बेल्लरी, सेक्रेटरी सौ.स्मिता लाडे तसेच समिती सदस्य चेतन विसाळ, शिवराम लटपटे, अमित बुटले, प्रितम पाटील, अमोल पाटील, सुनील महुलकर, प्रफुल्ल नारखेडे , श्याम जायसवाल, श्रीमती प्रियांका लेवालकर, श्रीमती रीना पटेल, ए. माटाई,श्री ताजनपुरे, अशुतोष पाट्रिकर आणि इतर सहकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"