फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

पिंपरी मार्केटमध्ये कपड्यांची तीन दुकाने फोडली

पिंपरी मार्केटमध्ये कपड्यांची तीन दुकाने फोडली

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरीतील मार्केटमध्ये दोन अनोळखी चोरट्यांनी कपड्यांची तीन दुकाने फोडल्याची घटना रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली.

पिंपरी मार्केट परिसरात जय बाबा मार्केट, बी ब्लॉक २५ येथे विशाल, राजकमल आणि शुभांगी ही तीन कपड्याची दुकाने रविवारी पहाटे फोडण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ही दुकाने फोडली. दुकाने फोडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांनी सुरुवातीला ११२ या क्रमांकावर संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी येऊन पाहणी केली. याबाबत दुकानदारांनी पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांनी दुकानातून रोख रक्कम आणि कपडे चोरून नेले आहेत.कापड दुकानांसह इतर तीन ते चार दुकाने देखील चोरट्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"