महाराष्ट्रात राहायचे तर मराठी आलीच पाहिजे :अजित पवार

पिंपरी : आपली मातृभाषा ही मराठी आहे, त्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे असे परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले .
भारतात हिंदी भाषा बोलली जाते, ती राष्ट्रभाषा आहे किंवा नाही यावरून अनेक वाद आहेत. मी त्यात जाणार नाही. जगामध्ये बहुतांश देशात इंग्रजी भाषा बोलली जाते .ज्याप्रमाणे इंग्रजी भाषा बहुताज देशात बोलली जाते,त्याप्रमाणे संपूर्ण भारतात हिंदी भाषा बोलली गेली पाहिजे .आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून आपल्याला मातृभाषेला एक नंबरचे स्थान आहे असे असे पवार म्हणाले.

नाशिक येथील दंगलीवरून त्यांनी आपले मत मांडले या दंगली प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल .राज्यात कायदा सुव्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे त्यांनी सांगितले