फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
महाराष्ट्र

मी थोड्या दिवसाचा पाहुणा, जरांगे पाटलांच्या डोळ्यातून अश्रू!

मी थोड्या दिवसाचा पाहुणा, जरांगे पाटलांच्या डोळ्यातून अश्रू!

नारायण गडावर दसरा मेळाव्यात मराठा समाजाला उद्देशून भाषण
 बीड : येथील नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला उद्देशून भाषण केले. त्यापूर्वी त्यांनी नारायण गडावर जाऊन दर्शन घेतले .यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळल्याचे दिसून आले .जरांगे पाटील रुग्णालयातून दसरा मेळाव्यासाठी खास नारायण गडावर आले होते .त्यामुळे आजारपणातच त्यांनी जोरकसपणे मराठा समाजाला आवाहन केले .

vijya dasmi
vijya dasmi

मोठ्या संख्येने जमलेल्या मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय असे म्हणत जरांगे पाटील यांनी नारायण गडावरून भाषणाला सुरुवात केली. मायबाप हो बोलायला लई त्रास होतो .आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळते अशी मला मिळाली .तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळेल .लई वेदना होतात ,शरीराला त्रास आहे. मी पाच-सहा महिन्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे असे म्हणत जरांगे पाटील यांनी भावनिक भाषण केले. त्यावेळी नारायण गडावरील वातावरण भावुक झाल्याचे पाहायला मिळाले .जरांगे पाटलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले होते. तरीही त्यांनी उपस्थित आणि मराठा समाजाला उद्देशून भाषण केले .

दसऱ्याच्या निमित्ताने मराठा समाजाला सांभाळायचा असेल तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनाव लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासना पुढे उभे राहावे लागते. तुमच्या पोरांना तहसीलदार, आयपीएस ,कलेक्टर बनवा. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरू गेलं तर या गरीब समाजाला बसायला आधार होईल .सगळे बोगस आरक्षण घेतलेले बोगस लोक जाऊन तिथे बसलेत.. बोगस असे म्हणत जरांगे यांनी मराठा समाजाला सरकारी नोकरीत वरिष्ठ पदावर जाण्याचे आवाहन केले .तसेच मराठा आरक्षण ,ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कामाला लागा, प्रमाणपत्र काढून घ्या असेही पाटील यांनी आवाहन केले.

.विजय दशमीच्या दसऱ्याचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी गाजत असून सारव गाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जातीयवादावर प्रहार करत भाषण केले .मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचे मिळावे यानिमित्ताने होत आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"