फक्त मुद्द्याचं!

9th September 2025
पिंपरी-चिंचवड

पवना नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा हायड्रोलॉजी व हायड्रोलिक्स अहवाल तयार!

पवना नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा हायड्रोलॉजी व हायड्रोलिक्स अहवाल तयार!

 पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवना नदीचे पुनरुज्जीवन करणेकरिता महात्वाकांशी प्रकल्पाचे नियोजन केले आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातून पवना नदी वाहत असून तिची लांबी २४.४० किलोमीटर आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत अनुभवी तांत्रिक सल्लागार मे.एच.सी.पी. डिझाईन अन्ड मॅनेजमेंट प्रा.लि. यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर सल्लागाराने संपूर्ण पवना नदीचा सव्हे

करून नदीच्या पाण्याचे प्रदुषण कमी करणेसाठी व पूर नियंत्रण विषयक काम करणेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. सदर पवना नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पाचा हायड्रोलॉजी व हायड्रोलिक्स अहवाल भारत सरकारच्या Central Water and Power Research Station, Pune (CWPRS) मार्फत तयार करणेत आला आहे.

viarasmall
viarasmall

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाकरिता पर्यावरण ना हरकत दाखला मिळणेसाठी महाराष्ट्र शासनास दि.१०/१२/२०१९ रोजी अर्ज करणेत आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मा. State Expert Appraisal Committee 3 (SEAC-3) समितीमार्फत दि. ०८/०८/२०२३ रोजी मंजुरी प्राप्त झाली आहे. तदनंतर सदर अर्जावर महाराष्ट्र शासनाच्या मा. The State Environment Impact Assessment Authority (SEIAA) समिती मार्फत वेळोवेळी बैठक घेणेत आली होती. मा.SEIAA समितीमार्फत दि.१५/०५/२०२५ रोजी बैठक आयोजित केली होती. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये प्रकल्पाबाबचे माहितीचे सादरीकरण केले होते. दि.०७/०७/२०२५ रोजी मा. SEIAA समितीच्या बैठकीचा सभावृतांत प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पवना नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पास पर्यावरण ना हरकत दाखला देणेत आला आहे.

सदर प्रकल्पाकरिता राज्य व केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेनंतर निविदा कार्यवाही करून नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करणेत येणार आहे. सदर पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प नदी काठाचे संरक्षणासाठी, नदीकाठाची होणारी झीज टाळणेसाठी, जैव विविधता वाढीसाठी, पक्षांची घरटी, निवासस्थाने निर्माण करणेसाठी ठिकाणे, जवळचे जलाशय व नदीमध्ये जलचराचे वाढीसाठी, एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणार आहे. संजय कुलकर्णी मुख्य अभियंता (१) पर्यावरण अभियांत्रिकी विभाग

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"